आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
भारताच्या एकूण कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाने 107.63 कोटी मात्रांचा टप्पा केला पार
गेल्या 24 तासांत 30.90 लाख मात्रांचे लसीकरण
रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.23%
गेल्या 24 तासात 12,885 नव्या कोरोना रुग्णांची नोंद.
उपचाराधीन रुग्णांची संख्या (1,48,579) गेल्या 253 दिवसातली सर्वात कमी रूग्संणख्या
साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (1.17%) गेले 41 दिवस 2% पेक्षा कमी
Posted On:
04 NOV 2021 11:57AM by PIB Mumbai
गेल्या 24 तासात 30,90,920 मात्रांचे कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण झाल्याने भारताने 107.63 (1,07,63,14,440) कोटी मात्रांचा टप्पा ओलांडला आहे.
आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, 1,08,50,694 लसीकरण सत्रांच्या माध्यमातून या मात्रा देण्यात आल्या आहेत.
आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:
|
HCWs
|
1st Dose
|
1,03,79,479
|
|
2nd Dose
|
92,50,239
|
|
FLWs
|
1st Dose
|
1,83,72,253
|
|
2nd Dose
|
1,59,98,007
|
|
Age Group 18-44 years
|
1st Dose
|
42,26,22,413
|
|
2nd Dose
|
14,77,14,520
|
|
Age Group 45-59 years
|
1st Dose
|
17,58,96,942
|
|
2nd Dose
|
9,81,31,225
|
|
Over 60 years
|
1st Dose
|
11,03,49,903
|
|
2nd Dose
|
6,75,99,459
|
|
Total
|
1,07,63,14,440
|
गेल्या 24 तासांत 15,054 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (साथरोगाच्या सुरूवातीपासून ) वाढून 3,37,12,794 झाली आहे.
परिणामी, भारतातील रुग्ण बरे होण्याचा दर 98.23% झाला आहे.

केंद्र आणि राज्य सरकार / केंद्रशासित प्रदेश यांच्या एकत्रित प्रयत्नांचा परिणाम म्हणून सलग 130 दिवसांपासून 50,000 पेक्षा कमी नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद झाल्याचा कल कायम राहिला आहे.
गेल्या 24 तासात 12,885 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.

देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 1,48,579 आहे, जी गेल्या 253 दिवसांतली सर्वात कमी रुग्णसंख्या आहे. देशातील आतापर्यंतच्या एकूण बाधित रुग्णसंख्येच्या ती 0.43 % आहे. मार्च 2020 पासूनची ही सर्वात कमी रूग्णसंख्या आहे.

देशभरात चाचण्यांची क्षमता वाढवली जात आहे. गेल्या 24 तासांमध्ये एकूण 10,67,914 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 61.23 (61,23,46,767) कोटींहून अधिक चाचण्या केल्या आहेत.
देशभरात चाचणी क्षमता वाढवण्यात आली असताना, साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 1.17% असून गेल्या 41 दिवसांपासून हा दर 2% पेक्षा कमी राहिला आहे. दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 1.21% असून गेले 31 दिवस हा दर 2 % पेक्षा कमी आहे तर गेले सलग 66 दिवस हा दर 3% पेक्षा कमी आहे.

***
M.Pange/V.Ghode/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1769404)
अभ्यागत कक्ष : 174