राष्ट्रपती कार्यालय

दीपावलीच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींच्या शुभेच्छा

Posted On: 03 NOV 2021 7:18PM by PIB Mumbai

 

राष्ट्रपती श्री राम नाथ कोविंद यांनी दीपावलीच्या पूर्वसंध्येला आपल्या देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत.

एका संदेशात राष्ट्रपतींनी म्हटले आहे की, दीपावलीच्या पावन पर्वानिमित्त मी देशातील आणि परदेशातील माझ्या सर्व बांधवांचे अभिष्टचिंतन करतो आणि त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो.

दीपावलीचा सण दुष्टावर सुष्टाच्या आणि अंधारावर प्रकाशाच्या विजयाचे प्रतीक आहे. हा सण मोठ्या प्रमाणावर आपल्या समाजातील विविध वर्गांतील विविध श्रद्धांचे पालन करणारे लोक साजरा करतात. दीपावलीचा शुभ मुहूर्त परस्पर स्नेह, बंधुता आणि आपुलकीचा संदेश देतो. खरं तर, आपली समृद्धी आणि आनंद परस्परांना सामायिक करण्याचे हे एक औचित्य आहे.

चला, हा सण एकत्रितपणे स्वच्छ आणि सुरक्षित वातावरणात साजरा करूया आणि पर्यावरणाच्या संवर्धन आणि संरक्षणात योगदान देण्याचा संकल्प करूया.

राष्ट्रपतींचा संदेश हिंदीमध्ये पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा

***

S.Patil/V.Joshi/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1769279) Visitor Counter : 160