गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय गृह मंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आज  नवी दिल्लीत राष्ट्रीय स्तरावर ‘आयुष्मान सीएपीएफ’चा केला प्रारंभ


एनएसजी जवानाला आयुष्मान कार्ड प्रदान करत केंद्रीय गृह मंत्र्यांनी केला योजनेचा प्रारंभ, एनएसजी जवानांना कार्ड वितरीत करण्यासाठी त्यांनी महासंचालकांकडे आयुष्मान सीएपीएफ ची कार्ड सोपवली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या सुरक्षा बलांच्या हिताला नेहमीच सर्वोच्च प्राधान्य दिले आणि त्यांच्या कल्याणासाठी अनेक पावले उचलली

सुमारे 35 लाख कार्डांचे वितरण डिसेंबर 2021पर्यंत पूर्ण होईल.

प्रविष्टि तिथि: 02 NOV 2021 8:39PM by PIB Mumbai

 

केंद्रीय गृह मंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आज  नवी दिल्लीत राष्ट्रीय स्तरावर आयुष्मान सीएपीएफचा प्रारंभ केला. एनएसजी अर्थात राष्ट्रीय सुरक्षा गार्डच्या जवानाला आयुष्मान कार्ड प्रदान करत केंद्रीय गृह मंत्र्यांनी योजनेचा प्रारंभ केला.  एनएसजी जवानांना कार्ड वितरीत करण्यासाठी त्यांनी महासंचालकांकडे आयुष्मान सीएपीएफ ची कार्ड सोपवली.वैद्यक देवतावैद्यराज धन्वंतरींच्या प्रती आदर व्यक्त करण्यासाठी केल्या जाणाऱ्या धन्वंतरी पूजेच्या आजच्या पवित्र दिनी सीएपीएफ अर्थात केंद्रीय सशत्र पोलीस दलाच्या कर्मचाऱ्यांना   आरोग्य कार्ड वितरीत करण्याची सुरवात झाली आहे. आजपासून सीएपीएफच्या कर्मचाऱ्यांना आरोग्य कार्ड वितरीत करण्याची सुरवात होत असून वितरीत करण्यात आलेल्या कार्डांची संख्या गृह मंत्रालयाच्या संकेत स्थळावर दररोज दर्शवली जाईल. सुमारे 35 लाख कार्डांचे वितरण डिसेंबर 2021पर्यंत पूर्ण होईल.

23 जानेवारी 2021 ला केंद्रीय गृह मंत्र्यांनी प्रायोगिक तत्वावर आयुष्मान सीएपीएफयोजनेचा आसाम मध्ये प्रारंभ केला होता. सीएपीएफच्या सर्व कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आरोग्य सुविधा पुरवण्यासाठीची ही योजना आहे. ही योजना म्हणजे गृह मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण यांचा संयुक्त उपक्रम आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या सुरक्षा बलांच्या हिताला नेहमीच सर्वोच्च प्राधान्य दिले आणि त्यांच्या कल्याणासाठी अनेक पावले उचलली.सीएपीएफने कोणतीही विवंचना न करता त्यांनी देशाच्या सुरक्षेची काळजी घ्यावी, मोदी सरकार त्यांच्या कुटुंबाची काळजी घेईल  असे गृह मंत्री म्हणाले. केंद्रीय गृह मंत्रालया अंतर्गत येणाऱ्या आसाम रायफल्स, सीमा सुरक्षा दल, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, केंद्रीय राखीव पोलीस दल, इंडो-तिबेट सीमा पोलीस, राष्ट्रीय सुरक्षा गार्ड  आणि सशस्त्र सीमा बलाचे कार्यरत कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय यांना या योजनेत समाविष्ट करण्यात आले आहे.सीएपीएफ कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय आता आयुष्मान भारत पीएम-जेएवाय किंवा  केंद्रीय सरकारी आरोग्य योजनेअंतर्गत सूचीबद्ध रुग्णालयात रोकडविरहीत बाह्य रुग्णसेवा तसेच रुग्णाला रुग्णालयात दाखल केल्यानंतरच्या सेवांचा लाभ घेऊ शकतील.

***

S.Patil/N.Chitale/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1769257) आगंतुक पटल : 278
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Malayalam