आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड – 19 बाबत अद्ययावत माहिती
Posted On:
03 NOV 2021 9:08AM by PIB Mumbai
देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत भारताने आतापर्यन्त एकूण 107.29 कोटी मात्रा दिल्या आहेत
गेल्या 24 तासात देशभरात 11,903 नवीन रुग्णांची नोंद झाली
सध्या रुग्ण बरे होण्याचा दर 98.22% ; मार्च 2020 पासून सर्वाधिक दर
गेल्या 24 तासात 14,159 रुग्ण बरे झाले, एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या वाढून 3,36,97,740
उपचाराधीन रुग्णांची संख्या एकूण रुग्णसंख्येच्या 1 % पेक्षा कमी आहे, सध्या त्याचे प्रमाण 0.44% , मार्च 2020 पासून सर्वात कमी रुग्णसंख्या
देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या 1,51,209 आहे, 252 दिवसांमधील सर्वात कमी संख्या
दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (1.11 %) , गेले 30 दिवस 2 % पेक्षा कमी
साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (1.18 %) , गेले 40 दिवस 2 % पेक्षा कमी
आतापर्यंत एकूण 61.12 कोटी चाचण्या करण्यात आल्या.
***
JaideviPS/SK/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1769135)
Visitor Counter : 234