भारतीय निवडणूक आयोग
विधानसभेच्या सदस्यांद्वारे महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य निवडण्यासाठी पोटनिवडणूक
Posted On:
31 OCT 2021 3:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 31 ऑक्टोबर 2021
महाराष्ट्र विधानपरिषदेत एक आकस्मिक रिक्त झालेली जागा महाराष्ट्राच्या विधानसभेच्या सदस्यांद्वारे भरली जाणार आहे.रिक्त पदाचा तपशील खालीलप्रमाणे आहे:
अनु क्र.
|
सदस्याचे नाव
|
निवडणुकीचे स्वरूप
|
तारीख आणि रिक्त जागा झाल्याचे कारण
|
मुदत पर्यंत
|
1
|
श्री. शरद नामदेव रणपिसे
|
विधानसभा सदस्यांच्या माध्यमातून
|
23.09.2021 मृत्यू
|
27.07.2024
|
2. आयोगाने खालील नियोजित वेळापत्रकानुसार उपरोक्त रिक्त जागा भरण्यासाठी महाराष्ट्र विधानसभेच्या सदस्यांद्वारे महाराष्ट्र विधानपरिषदेची पोटनिवडणूक घेण्याचा निर्णय घेतला आहे:
अनु क्र.
|
निवडणुकीचा कार्यक्रम
|
तारीख
|
1
|
अधिसूचना जारी करणे
|
9 नोव्हेंबर, 2021 (मंगळवार)
|
2
|
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख
|
16 नोव्हेंबर, 2021 (मंगळवार)
|
3
|
उमेदवारी अर्जांची छाननी
|
17 नोव्हेंबर, 2021 (बुधवार)
|
4
|
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख
|
22 नोव्हेंबर, 2021 (सोमवार)
|
5
|
मतदानाची तारीख
|
29 नोव्हेंबर, 2021 (सोमवार)
|
6
|
मतदानाची वेळ
|
सकाळी 9 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत
|
7
|
मतमोजणी
|
29 नोव्हेंबर 2021 (सोमवार) संध्याकाळी 05:00 वाजता
|
8
|
निवडणूक प्रक्रिया पूर्ण होण्याची तारीख
|
1 डिसेंबर 2021 (बुधवार)
|
3.कोविड-19 ची विस्तृत मार्गदर्शक तत्त्वे, भारत निवडणूक आयोगाने यापूर्वीच जारी केली आहेत तसेच भारत निवडणूक आयोगाने अलीकडे केलेली मार्गदर्शक तत्त्वे 28.09.2021 च्या प्रसिद्धिपत्रकाच्या 06 व्या परिच्छेदात समाविष्ट असून https://eci.gov.in/candidate-political-parties/instructions-on-covid-19/. या लिंकवर उपलब्ध आहेत. सर्व व्यक्तींसाठी संपूर्ण निवडणूक प्रक्रियेदरम्यान, ही मार्गदर्शक तत्वे लागू असतील त्याचे त्यांनी पालन करावे.
4.निवडणूक आयोजित करताना कोविड-19 प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत विद्यमान सूचनांचे पालन केले जात आहे का हे सुनिश्चित करण्यासाठी राज्याच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचे निर्देश मुख्य सचिव, महाराष्ट्र यांना देण्यात आले आहेत.
* * *
M.Chopade/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1768115)
Visitor Counter : 271