आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

देशातील एकूण कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण 104.82 कोटीहून अधिक


गेल्या 24 तासात 74 लाखांहून अधिक लसींच्या मात्रा देण्यात आल्या

देशात रुग्ण बरे होण्याचा सध्याचा दर 98.19%, मार्च 2020 पासून सर्वोच्च

देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे 14,348 नवे दैनंदिन रुग्ण

देशातली सध्या उपचाराधीन रुग्णसंख्या 1,61,334

साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर (1.18%) गेल्या 35 दिवसांपासून 2% पेक्षा कमी

Posted On: 29 OCT 2021 10:03AM by PIB Mumbai

देशात गेल्या 24 तासात  74,33,392  कोविड 19 प्रतिबंधक लसीच्या मात्रादेण्यात आल्या असूनआज सकाळी 7  वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार आतापर्यंत एकूण 104.82 कोटीपेक्षा अधिक (1,04,82,00,966)  मात्रा दिल्या आहेत. एकूण 1,04,57,932 सत्रांद्वारे  या मात्रा देण्यात आल्या  आहेत.


सकाळी वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार एकूण लसीच्या मात्रांची गटनिहाय विभागणी पुढील प्रमाणे आहे-

 

HCWs

1st Dose

1,03,78,753

2nd Dose

91,96,000

 

FLWs

1st Dose

1,83,71,035

2nd Dose

1,58,60,088

 

Age Group 18-44 years

1st Dose

41,47,31,641

2nd Dose

13,64,95,078

 

Age Group 45-59 years

1st Dose

17,38,19,237

2nd Dose

9,45,21,155

 

Over 60 years

1st Dose

10,91,45,076

2nd Dose

6,56,82,903

Total

1,04,82,00,966


गेल्या 24 तासात 13,198 रुग्ण कोरोना मुक्त झाले असून (महामारीच्या सुरवातीपासून) कोरोनाची लागण झालेल्यांपैकी  एकूण 3,36,27,632 रुग्ण आतापर्यंत  कोरोना मुक्त झाले आहेत. 

परिणामी कोरोनातून रुग्ण बरे होण्याचा दर  98.19% झाला आहे.


 

सलग 124 दिवसांपासून  50,000 पेक्षा कमी नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद होत असून केंद्र आणि राज्य सरकार/ केंद्र शासित प्रदेश यांच्या समन्वित प्रयत्नांचा हा परिणाम आहे.

मागील 24 तासात 14,348 नव्या रूग्णांची नोंद झाली.

 

सध्या सक्रीय रुग्ण संख्या 1,61,334 इतकी असून ही  संख्या एकूण उपचाराधीन  रुग्णांच्या 0.47% इतकी असून मार्च 2020 पासून सर्वात कमी आहे. 

देशात गेल्या 24 तासात 12,84,552 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 60.58 कोटीहून अधिक  (60,58,85,769) चाचण्या केल्या आहेत.

साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर सध्या 1.18% असून गेले  35 दिवस 2% पेक्षा कमी आहे. दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर 1.12% असून गेले 25 दिवस 2% पेक्षा कमी आणि 60  दिवस  3% पेक्षा कमी आहे.

 

***

JaydeviPS/SampadaP/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1767438) Visitor Counter : 239