आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड-19 अद्ययावत माहिती
Posted On:
29 OCT 2021 9:27AM by PIB Mumbai
देशव्यापी कोविड 19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 104.82 कोटी लसींच्या मात्रा देण्यात आल्या.
गेल्या 24 तासांत देशभरात कोविडचे 14,348 नवे रुग्ण आढळले.
सध्या रुग्ण बरे होण्याचा दर 98.19%
गेल्या 24 तासांत 13,198 रुग्ण कोविडमुक्त; आजपर्यंत बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 3,36,27,632
देशात एकूण रुग्णांच्या तुलनेत उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण एक टक्क्यापेक्षाही कमी, सध्या हे प्रमाण 0.47%; मार्च 2020 पासूनचे सर्वात कमी प्रमाण
देशात सध्या उपचाराधीन रुग्णांची एकूण संख्या 1,61,334
साप्ताहिक पॉझिटिव्हीटी दर (1.18%) गेल्या 35 दिवसांपासून सातत्याने 2% पेक्षा कमी
दैनंदिन पॉझिटिव्हीटी दर (1.12%) गेल्या 25 दिवसांपासून सातत्याने 2% पेक्षा कमी
आतापर्यंत एकूण 60.58 कोटी चाचण्या झाल्या.
***
Jaydevi PS/Radhika/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1767421)
Visitor Counter : 184