संरक्षण मंत्रालय
बांगलादेशच्या नौदल प्रमुखांची पश्चिमी नौदल कमांड मुख्यालयाला भेट
Posted On:
28 OCT 2021 4:31PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 ऑक्टोबर 2021
बांगलादेशचे नौदल प्रमुख ॲडमिरल एम शाहीन इकबाल, यांनी 27 ऑक्टोबर 2021 रोजी पश्चिमी नौदल कमांड मुख्यालयाला भेट दिली आणि पश्चिमी नौदल कमांडचे प्रमुख आणि ध्वज अधिकारी व्हाईस ॲडमिरल आर. हरी कुमार यांच्याशी चर्चा केली. 1971 मध्ये झालेल्या बांगलादेश स्वातंत्र्य युद्धाचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. म्हणूनच सध्याची बांगलादेशच्या नौदल प्रमुखांची 22 ते 29 ऑक्टोबर 2021 या कालावधीतील भारताला भेट ही विशेष आहे.
यावेळी दोन्ही अधिकाऱ्यांनी अनेक बाबींवर चर्चा केली. दोन देशांमध्ये असलेले सहयोगाचे बंध दृढ करणे, परस्परांची कार्यशैली, प्रशिक्षण, दहशतवाद विरोधी सहकार्य आणि एकूणच सर्वंकष धोरणात्मक भागीदारीचा भाग म्हणून असलेले द्विपक्षीय सहकार्य यासारख्या बऱ्याच गोष्टींवर त्यांची चर्चा झाली. भारत आणि बांगलादेश यामध्ये एकसमान इतिहास, संस्कृती आणि भाषा यांचा बंध आहे. 1971 च्या युद्धात या देशांमधील सहकार्याचा दोन्ही देशांमध्ये अजूनही अभिमानाने उल्लेख केला जातो.
1971 मध्ये बांगलादेशाच्या स्वातंत्र्ययुद्धात भाग घेतल्याबद्दल भारताला अभिमान वाटतो. या युद्धात बांगलादेशाच्या जनतेने बजावलेली भूमिका आणि त्यांनी केलेला त्याग याबद्दल भारताला अत्यंत आदर आहे, असे हरी कुमार यांनी चर्चेदरम्यान स्पष्ट केले. बांगलादेश स्वातंत्र्याच्या या सुवर्ण महोत्सवी वर्षाचे भारतीयसुद्धा आनंदाने स्वागत करत आहेत. आणि बांगलादेशाच्या सुवर्ण महोत्सवी स्वातंत्र्य वर्षानिमित्त अनेक कार्यक्रम आयोजित केले जात आहेत असेही त्यांनी सांगितले.
2022 या वर्षात बांगलादेशला भरणार असलेला आंतरराष्ट्रीय आरमार अभ्यास यशस्वी होण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन नौदल प्रमुखांनी भेटीवर आलेल्या बांगलादेशच्या नौदल प्रमुखांना दिले . नौदल प्रमुख कोची येथील ASW विद्यालयाचे माजी विद्यार्थी असल्यामुळे दोन्ही नौदलामधील प्रशिक्षणादरम्यानच्या सहकार्याची प्रशंसा करत त्यांनी या दोन्ही देशाचे नौदल विशेष मोहिमा डायविंग, हवाई तंत्रज्ञान आदी बाबींमध्ये एकमेकांना प्रशिक्षित करत असल्यास बद्दल समाधान व्यक्त केले.
बांगलादेशचे नौदल प्रमुख आणि त्यांच्या पत्नी यांनी नौदलाच्या सुविधांचा आढावा घेतला आणि एन डब्ल्यू डब्ल्यू ए अर्थात नौदल सहचरी कल्याण संस्थेविषयी माहिती दिली.
![](https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/Pix4KPYR.JPG)
![](https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/Pix3O1AQ.JPG)
Jaydevi PS/V.Sahjrao/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1767209)
Visitor Counter : 207