PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र

Posted On: 27 OCT 2021 7:40PM by PIB Mumbai

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0020FX3.png https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image001BPSF.jpg

  • 103.53 cr vaccine doses have been administered so far under Nationwide Vaccination Drive
  • 13,451 new cases in the last 24 hours
  • Recovery Rate currently at 98.19%; Highest since March 2020
  • 14,021 recoveries in the last 24 hours increases Total Recoveries to 3,35,97,339
  • Active cases account for less than 1% of total cases, currently at 0.48%; Lowest since March 2020
  • India's Active caseload stands at 1,62,661; lowest in 242 days
  • Weekly Positivity Rate (1.22%) less than 2% for last 33 days
  • Daily positivity rate (1.03%) less than 2% for last 23 days
  • 60.32 cr Total Tests conducted so far

#Unite2FightCorona

#IndiaFightsCorona

Image

नवी दिल्‍ली/मुंबई, 27 ऑक्टोबर 2021

 

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती

देशात गेल्या 24 तासात  55,89,124  कोविड 19 प्रतिबंधक लसीच्या मात्रा देण्यात आल्या असून आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार भारताने आतापर्यंत एकूण 103.53 कोटीहून अधिक (1,03,53,25,577) मात्रा दिल्या आहेत. एकूण 1,02,95,714 सत्रांद्वारे या मात्रा देण्यात आल्या  आहेत.

गेल्या 24 तासात 14,021 रुग्ण कोरोना मुक्त झाले असून (महामारीच्या सुरवातीपासून) कोरोनाची लागण झालेल्यांपैकी एकूण 3,35,97,339 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. परीणामी कोरोनातून रुग्ण बरे होण्याचा दर  98.19% झाला आहे.हा दर मार्च 2020 पासूनचा सर्वोच्च दर आहे. 

सलग  122 दिवसांपासून  50,000 पेक्षा कमी नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद होत असून केंद्र आणि राज्य सरकार/ केंद्र शासित प्रदेश यांच्या समन्वित प्रयत्नांचा हा परिणाम आहे. गेल्या 24 तासात 13,451 नव्या रुग्णांची नोंद झाली. ही संख्या गेल्या 242 दिवसातली  सर्वात कमी संख्या आहे. देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या  2 लाखाच्या खाली कायम असून सध्याची 1,62,661  ही संख्या गेल्या 242  दिवसातली  सर्वात कमी रुग्णसंख्या आहे. हे प्रमाण आतापर्यंतच्या एकूण पॉझिटीव्ह रुग्णांच्या 0.48% इतके असून मार्च 2020 पासून ते सर्वात कमी आहे.

देशात गेल्या 24 तासात 13,05,962 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 60.32 कोटीहून अधिक  (60,32,07,505) चाचण्या केल्या आहेत. देशभरात साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर सध्या 1.22%  असून गेले  33 दिवस 2% पेक्षा कमी आहे. दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर 1.03% असून गेले 23  दिवस 2% पेक्षा कमी आणि 58  दिवस 3% पेक्षा कमी आहे.

 

इतर अपडेट्स :

  • राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडे अजूनही 12.37 कोटींपेक्षा अधिक लसीच्या न वापरलेल्या उपयुक्त मात्रा शिल्लक आहेत.

 

महत्त्‍वाचे ट्विट्स

 

 

 

 

 

 

* * *

M.Chopade/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1767012) Visitor Counter : 120