आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

देशात कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाच्या 103.53 कोटीहून अधिक मात्रा पूर्ण


देशात रुग्ण बरे होण्याचा सध्याचा दर 98.19%, मार्च 2020 पासून सर्वोच्च दर

देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे 13,451 नवे दैनंदिन रुग्ण

देशातली सध्या उपचाराधीन रुग्णसंख्या (1,62,661) ही गेल्या 242 दिवसातली सर्वात कमी संख्या

साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर (1.22%) गेल्या 33 दिवसांपासून 2% हून कमी


Posted On: 27 OCT 2021 9:34AM by PIB Mumbai

देशात गेल्या 24 तासात  55,89,124  कोविड 19 प्रतिबंधक लसीच्या मात्रा देण्यात आल्या असून आज सकाळी 7  वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार भारताने आतापर्यंत एकूण   103.53 कोटीहून अधिक  (1,03,53,25,577)  मात्रा दिल्या आहेत. एकूण 1,02,95,714 सत्रांद्वारे  या मात्रा देण्यात आल्या  आहेत.

सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार एकूण लसीच्या मात्रांची गटनिहाय विभागणी पुढील प्रमाणे आहे-


 

HCWs

1st Dose

1,03,78,437

2nd Dose

91,71,725

 

FLWs

1st Dose

1,83,70,088

2nd Dose

1,57,92,606

 

Age Group 18-44 years

1st Dose

41,12,06,354

2nd Dose

13,12,65,535

 

Age Group 45-59 years

1st Dose

17,29,71,002

2nd Dose

9,28,01,459

 

Over 60 years

1st Dose

10,86,31,844

2nd Dose

6,47,36,527

Total

1,03,53,25,577

 

 

गेल्या 24 तासात 14,021 रुग्ण कोरोना मुक्त झाले असून (महामारीच्या सुरवातीपासून) कोरोनाची लागण झालेल्यांपैकी एकूण 3,35,97,339 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.  
परीणामी कोरोनातून रुग्ण बरे होण्याचा दर  98.19% झाला आहे.हा दर मार्च 2020 पासूनचा सर्वोच्च दर आहे.  

 

सलग  122 दिवसांपासून  50,000 पेक्षा कमी नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद होत असून केंद्र आणि राज्य सरकार/ केंद्र शासित प्रदेश यांच्या समन्वित प्रयत्नांचा हा परिणाम आहे.

गेल्या 24 तासात 13,451 नव्या रुग्णांची नोंद झाली. ही संख्या गेल्या 242 दिवसातली  सर्वात कमी संख्या आहे.

देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या  2 लाखाच्या खाली कायम असून सध्याची 1,62,661  ही संख्या गेल्या 242  दिवसातली  सर्वात कमी रुग्णसंख्या  आहे.

हे प्रमाण आतापर्यंतच्या एकूण पॉझिटीव्ह रुग्णांच्या  0.48% इतके  असून मार्च 2020 पासून ते सर्वात कमी आहे.

 

 

देशात गेल्या 24 तासात 13,05,962 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 60.32 कोटीहून अधिक  (60,32,07,505) चाचण्या केल्या आहेत.

 

देशभरात साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर सध्या 1.22%  असून गेले  33 दिवस 2% पेक्षा कमी आहे. दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर 1.03% असून गेले 23  दिवस 2% पेक्षा कमी आणि 58  दिवस  3% पेक्षा कमी आहे.

***

 

Jaydevi PS/ Sampada/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1766840) Visitor Counter : 187