आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड – 19 बाबत अद्ययावत माहिती
Posted On:
27 OCT 2021 9:13AM by PIB Mumbai
देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत भारताने आतापर्यन्त एकूण 103.53 कोटी मात्रा दिल्या आहेत
गेल्या 24 तासात 13,451 नवीन रुग्णांची नोंद झाली,
सध्या रुग्ण बरे होण्याचा दर 98.19%;; मार्च 2020 पासून सर्वाधिक दर
गेल्या 24 तासात देशभरात 14,021 रुग्ण बरे झाले, एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या वाढून 3,35,97,339
उपचाराधीन रुग्णांची संख्या एकूण रुग्णसंख्येच्या 1 % पेक्षा कमी आहे, सध्या त्याचे प्रमाण 0.48%, मार्च 2020 पासून सर्वात कमी रुग्णसंख्या
देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 1,62,661 आहे, गेल्या 242 दिवसांमधील ही सर्वात कमी संख्या
साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (1.22 %) , गेले 33 दिवस 2 % पेक्षा कमी
दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (1.03%) , गेले 23 दिवस 2 % पेक्षा कमी
आतापर्यंत एकूण 60.32 कोटी चाचण्या करण्यात आल्या.
***
Jaydevi PS/ Sushama K/C Yadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1766823)
Visitor Counter : 198