वस्त्रोद्योग मंत्रालय
आता वेळ आहे भारतात वस्त्रोद्योग यंत्रसामग्रीमधील जागतिक तोडीचे 100 प्रसिद्ध कुशल उत्पादक तयार करण्याची – पीयूष गोयल
Posted On:
24 OCT 2021 4:27PM by PIB Mumbai
केंद्रिय वाणिज्य आणि उद्योग, वस्रोद्योग आणि ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री, पीयूष गोयल यांनी नाविन्यपूर्ण भागीदारी मिळविण्यासाठी वस्त्रोद्योग क्षेत्राने वेग, कौशल्य आणि प्रमाण यावर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन वस्त्रोद्योग क्षेत्राला केले आहे. जगभरात ओळखले जातील, असे 100 भारतीय वस्त्रोद्योग यंत्रसामग्री उत्पादक विकसित करण्याचे आवाहन केले आहे. `टेक्नॉलॉजी गॅप आणि वे फॉरवर्ड फॉर टेक्स्टाइल मशिनिरी मॅन्युफॅक्चरर्स` (वस्त्रोद्योग यंत्र उत्पादकांसाठी तंत्रज्ञानाच्या मर्यादा आणि पुढे जाण्याचा मार्ग) विषयावर वस्त्रोद्योग यंत्र उत्पादकांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधताना ते बोलत होते. गोयल यांनी वस्त्रोद्योग यंत्र उत्पादकांना आदेश आणि नियंत्रण अशा मानसिकतेतून बाहेर पडून कापड उद्योगाचे नाव दुमदुमले पाहिजे अशा ध्येयाने प्लग अँड प्ले अर्थात, तयार माल उपलब्ध करून देणे, अशा पद्धतीने काम करण्याचे आवाहनही केले.
ते म्हणाले, भारत हा वस्त्रोद्योग यंत्र निर्मिती, निर्मितीचे प्रमाण, जगाला हव्या असणाऱ्या यंत्राची निवड करून दर्जा आणि प्रमाण उपलब्ध करून देण्यामध्ये जागतिक दर्जाचा उत्पादक बनला पाहिजे. ते म्हणाले की, आमचा आयात करण्यासाठी विरोध नाही, परंतु, वस्त्र अभियांत्रिकी उद्योग आणि सरकार यांच्या एकत्रित प्रयत्नांनी भारतातील वस्त्र यंत्रणेने आयातीवर अवलंबून राहणे कमी केले पाहिजे. त्यांनी असेही नमूद केले की, दर्जावर लक्ष केंद्रित केले तर मोठी बाजारपेठ आणि मोठ्या प्रमाणावरील उत्पादन काबीज करण्यास दत होईल.
जागतिक कुशल तंत्रज्ञांबाबतच्या प्रॉडक्शन लिंक्ड इन्सेन्टिव्ह (पीएलआय) योजनेबद्दल सांगताना आणि पीएम मित्रा (PM MITRA) योजना जी टेक्साइल क्लस्टर आणण्याचा प्रयत्न करते आहे, त्याबाबत गोयल म्हणाले की, उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी लवकर सात जागा शोधल्या जातील आणि वेगवान पद्धतीने तयार माल उपलब्ध करून देण्यासाठी सामान्यपणे पायाभूत सुविधांची सोय करून दिली जाईल. त्यांनी उत्पादकांना असेही आवाहन केले की, पुढाकार घेऊन PM MITRA योजनेत सहभागी व्हा आणि त्याचा लाभ घेऊन उत्पादन केंद्रांची स्थापना करा.
***
M.Chopade/S.Shaikh/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1766125)