राष्ट्रपती कार्यालय
दसऱ्याच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींच्या जनतेला शुभेच्छा
प्रविष्टि तिथि:
14 OCT 2021 9:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 ऑक्टोबर 2021
विजयादशमी म्हणजे दसऱ्याच्या पूर्वसंध्येला, राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी आपल्या संदेशाद्वारे जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या संदेशात राष्ट्रपती म्हणाले:-
“विजयादशमीच्या पवित्र प्रसंगी मी देशातील तसेच भारताबाहेर राहणाऱ्या सर्व नागरिकांना शुभेच्छा देतो.
विजयादशमीचा उत्सव दुष्ट शक्तीवर सुष्ट शक्तीने मिळवलेल्या विजयाचा उत्सव आहे. हा उत्सव आपल्याला, मूल्ये, चांगुलपणा आणि नैतिकतेच्या मार्गावर चालण्यासाठी प्रेरणा देतो. प्रभू श्रीरामाचे व्यक्तिमत्व आणि ‘मर्यादा पुरुषोत्तम’ म्हणून त्यांचे आदर्श, आपल्या सर्वांना आदर्श वर्तन करण्याची प्रेरणा देतात.
हा उत्सव आपल्यातली नैतिक मूल्ये अधिक बळकट करणारा ठरो आणि संपूर्ण समाजाचा नैतिक पाया भक्कम करणारा असो तसेच आपल्या सर्व नागरिकांना ‘देश उभारणीची प्रेरणा देणारा ठरावा, असे राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
राष्ट्रपतींचे संपूर्ण भाषण ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.
M.Chopade/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1764052)
आगंतुक पटल : 237