दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
भारतात दूरसंचार आणि नेटवर्किंग उत्पादने निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी उत्पादन संलग्न प्रोत्साहन (पीएलआय) योजना
या योजनेअंतर्गत 16 एमएसएमई आणि 15 गैर- एमएसएमई (8 देशांतर्गत आणि 7 जागतिक कंपन्या) अशा 31 कंपन्यांना मान्यता
Posted On:
14 OCT 2021 4:36PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 ऑक्टोबर 2021
केंद्रीय दळणवळण मंत्रालयाचे राज्यमंत्री श्री देवूसिंह चौहान यांनी आज दूरसंचार आणि नेटवर्किंग उत्पादन निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी उत्पादन संलग्न प्रोत्साहन (पीएलआय) योजनेचा प्रारंभ केला. दूरसंचार विभागाच्या विशेष सचिव श्रीमती अनिता प्रवीण आणि दळणवळण मंत्रालयाच्या दूरसंचार विभागाचे वरिष्ठ अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते.
पंतप्रधानांच्या संकल्पनेतील आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी ही उत्पादन संलग्न प्रोत्साहन सुरु करण्यात आली आहे ,यामुळे दूरसंचार आणि नेटवर्किंग उत्पादनांच्या आयातीसाठी इतर देशांवरील भारताचे अवलंबित्व कमी करण्यास मदत होईल, असे चौहान यांनी यावेळी सांगितले.
वाढत्या गुंतवणुकीला प्रोत्साहन देऊन आणि एकूण 2,195 कोटी रुपयांच्या एकूण उलाढालीसह दूरसंचार आणि नेटवर्किंग उत्पादनांचे देशांतर्गत उत्पादन वाढवण्याच्या उद्देशाने दूरसंचार विभागाने प्रोत्साहन संलग्न योजना सुरू केली आहे.ही योजना 1 एप्रिल 2021 पासून लागू .करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आर्थिक वर्ष 2021-22 ते आर्थिक वर्ष 2025-26 पर्यंत पाच (5) वर्षांच्या कालावधीसाठी साहाय्य प्रदान केले जाईल.
ही योजना आणि योजनेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, 16 सूक्ष्म, लघु ,मध्यम उद्योग आणि 15 गैर- सूक्ष्म, लघु , मध्यम उद्योग (8 देशांतर्गत आणि 7 जागतिक कंपन्या) अशा एकूण 31 पात्र कंपन्यांचा समावेश या योजनेत करण्यात आला आहे. आणि त्यांना दळणवळण मंत्रालयाअंतर्गत असणाऱ्या दूरसंचार विभागाच्या उत्पादन संलग्न प्रोत्साहन (PLI) योजनेअंतर्गत मंजुरी दिली जात आहे.
पात्र सूक्ष्म , लघु आणि मध्यम उद्योग कंपन्या खालीलप्रमाणे आहेत:
i. कोरल टेलिकॉम लिमिटेड
ii. इहूम आयओटी प्रायव्हेट लिमिटेड
iii. एलकॉम इनोव्हेशन्स प्रायव्हेट लिमिटेड
iv. फ्रॉग सेलसॅट लिमिटेड
v. जीडीएन एंटरप्रायजेस प्रायव्हेट लिमिटेड
vi. जीएक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड
vii. लेखा वायरलेस सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड
viii. पनाची डिजिलाईफ लिमिटेड
ix. प्रियराज इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड
x. सिक्स्थ एनर्जी टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड
xi. स्कायक्वाड इलेक्ट्रॉनिक्स अँड अप्लायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड
xii. एसटीएल नेटवर्क लिमिटेड
xiii. सुरभी सॅटकॉम प्रायव्हेट लिमिटेड
xiv. सिनेग्रा ईएमएस लिमिटेड
xv. सिस्ट्रोम टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड
xvi. टीयानिन वर्ल्डटेक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड
गैर- एमएसएमई श्रेणी अंतर्गत पात्र देशांतर्गत कंपन्या खालीलप्रमाणे-
i. आकाशस्थ टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड,
ii. डिक्सन इलेक्ट्रो अप्लायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड,
iii. एचएफसीएल टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड,
iv. आयटीआय लिमिटेड,
v. निओलिंक टेली कम्युनिकेशन्स प्रायव्हेट लिमिटेड,
vi. सिर्मा टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड,
vii. तेजस नेटवर्क लिमिटेड आणि
viii. व्हीव्हीडीएन टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड
गैर- एमएसएमई श्रेणी अंतर्गत पात्र जागतिक कंपन्या खालीलप्रमाणे-
i. कॉमस्कोप इंडिया प्रायव्हेट लिमिटेड,
ii. फ्लेक्सट्रॉनिक्स टेक्नॉलॉजीज (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड
iii. फॉक्सकॉन टेक्नॉलॉजी (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड,
v. नोकिया सोल्युशन्स अँड नेटवर्क इंडिया प्रायव्हेट लिमिटेड,
vi. रायझिंग स्टार्स हाय-टेक प्रायव्हेट लिमिटेड,
vii. सॅनमायना -एससीआय इंडिया प्रायव्हेट लिमिटेड.
अर्जदार कंपन्यांच्या वचनबद्धतेनुसार ,या 31 अर्जदार कंपन्यांनी या योजनेच्या कालावधीत सुमारे 1.82 लाख कोटी रुपयांच्या अपेक्षित वाढीव उत्पादनासह आगामी 4 वर्षात 3345 कोटी रुपयांची गुंतवणूक करणे आणि 40,000 हून अधिक लोकांना वाढीव रोजगार निर्माण करणे अपेक्षित आहे.
देशांतर्गत आणि जागतिक उत्पादकांकडून या योजनेला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद "आत्मनिर्भर भारत" - मेक इन इंडियावर दृढ विश्वास दर्शवतो. "डिजिटल इंडिया" च्या मोठ्या दृष्टिकोनात दूरसंचार उत्पादने महत्वाची भूमिका बजावतात
Jaydevi PS/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1763932)
Visitor Counter : 346