राष्ट्रपती कार्यालय
राष्ट्रपती द्रास येथे जवानांसोबत दसरा साजरा करणार
Posted On:
13 OCT 2021 5:55PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 ऑक्टोबर 2021
राष्ट्रपती राम नाथ कोविंद 14 आणि 15 ऑक्टोबर, 2021 रोजी लडाख आणि जम्मू आणि काश्मीरला भेट देणार आहेत.
14 ऑक्टोबर 2021 रोजी राष्ट्रपती सिंधू घाट, लेह येथे सिंधू दर्शन पूजा करतील. संध्याकाळी उधमपूर येथे ते जवानांशी संवाद साधतील.
15 ऑक्टोबर 2021 रोजी राष्ट्रपती द्रासमधील कारगिल युद्ध स्मारक येथे श्रद्धांजली अर्पण करतील आणि अधिकारी आणि जवानांशी संवाद साधतील.
* * *
M.Chopade/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1763664)
Visitor Counter : 213