आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

बेंगळुरु येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित पीएमबीजेपीच्या कार्यक्रमात डॉ मनसुख मांडवीया यांचे संबोधन

Posted On: 10 OCT 2021 9:58PM by PIB Mumbai

 

बेंगळुरु येथील बसवनगुडी इथे प्रधानमंत्री जनौषधी अभियानाअंतर्गत, 'स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी  वर्षानिमित्त आयोजित विशेष कर्यक्रमात, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री मनसुख मांडवीया यांचे भाषण झाले.

सर्वसामान्य लोकांना जेनेरिक औषधे परवडणाऱ्या किंमतीला उपलब्ध व्हावे म्हणून पंतप्रधान भारतीय जनऔषधी योजना सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत, जेनेरिक औषधे पुरविण्यासाठी 'जनऔषधी केंद्र' ही विशेष दुकाने सुरू करण्यात आली. देशाच्या प्रत्येक जिल्ह्यात किमान एक जनऔषधी केंद्र सुरू करणे हे या योजनेचे उद्दिष्ट होते.

पंतप्रधान जनऔषधी केंद्र हे व्यवसायासोबतच लोकसेवेचे माध्यम आहे, हे समजावून सांगताना डॉ मनसुख मांडविया म्हणाले, "जनऔषधी केंद्र उघडणाऱ्याला देशातल्या लोकांची सेवा करण्याची संधी मिळते. गुंतवणूकदारांसाठी हा व्यवसाय व्यावहारिकदृष्ट्या परवडणारा ठरावा, म्हणून केंद्र सरकार 20 टक्के कमिशन व्यतिरिक्त 3 लाख रुपयांचे अर्थसहाय्य देखील देते. ब्रँडेड औषधांच्या विक्रीत मिळणाऱ्या नफ्यातील तफावत भरून काढण्यासाठी हे अर्थसहाय्य दिले जाते. कारण जेनेरीक औषधांच्या किमती कमी असतात." ते पुढे म्हणाले, "कुणावरही दुकान बंद करण्याची वेळ येऊ नये म्हणून आम्ही हे अर्थसहाय्य देत आहोत." डॉ मनसुख मांडवीया यांनी PMBJP योजनेची, गरीब, शेतकरी स्नेही तसेच व्यवसायाभिमुख योजना म्हणून प्रशंसा केली. "गरीब लोकांची मदत करणे ही आमची प्राथमिकता आहे आणि जनऔषधी केंद्र हे गरीब आणि मध्यमवर्गासाठी वरदानच आहे," डॉ मांडविया म्हणाले. भारतात जनऔषधी केंद्र हे 'मोदींचे औषधांचे दुकान' म्हणून ओळखले जातात.

जनऔषधी केंद्रामुळे हृदयविकाराच्या रुग्णाचा औषधांचा खर्च महिना 4500 वरून 800 रुपयांवर आला, हा वैयक्तिक अनुभव केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी सांगितला. ते म्हणाले, जनऔषधी केंद्र ही मानव सेवा आहे. "जन सेवेकरीता दान-धर्म करणे हाच एकमेव मार्ग नाही. तर, त्यांचे खर्च कमी करणे ही देखील मोठी सेवा आहे," ते म्हणाले.

***

S.Thakur/R.Aghor/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1762790) Visitor Counter : 211