आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाच्या अंत्योदयाचा मार्ग मोकळा करण्यासाठी सिरिंजच्या निर्यातीवर प्रमाणात्मक निर्बंध
केवळ 3 महिन्यांसाठी सिरिंजच्या फक्त 3 श्रेण्यांवर प्रतिबंध लागू
Posted On:
09 OCT 2021 4:44PM by PIB Mumbai
जगातील सर्वात व्यापक असलेल्या भारतातील कोविड प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीमध्ये देशांतर्गत लस आणि सिरिंजच्या उत्पादकांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. भारताने आतापर्यंत जवळजवळ 94 कोटी लसीच्या मात्रा दिल्या आहेत तर 100 कोटीच्या टप्प्या नजीक पोहचलो आहोत. भारतातील शेवटच्या नागरिकाचे लसीकरण करण्याच्या दृढ राजकीय बांधिलकीसह, पंडीत दीनदयाल उपाध्याय यांच्या 'अंत्योदय' तत्त्वज्ञानाच्या मार्गाचा अवलंब करत सरकारने सिरिंजची देशांतर्गत उपलब्धता आणि वापर वाढवण्यासाठी सिरिंजच्या निर्यातीवर प्रमाणात्मक निर्बंध लावले आहेत.
सर्व पात्र नागरिकांना कमीतकमी वेळेत लसीकरण करण्यासाठी, कार्यक्रमाची गती टिकवण्यासाठी सिरिंज अत्यावश्यक आहेत. लसीच्या व्यवस्थापनासाठी वापरल्या जाणाऱ्या सिरिंजची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने, भारत सरकारने केवळ सिरिंजच्या खालील श्रेणींच्या निर्यातीवर हे प्रमाणात्मक निर्बंध लागू केले आहेत: -
• 0.5 मिली/ 1 मिली एडी (ऑटो-डिसेबल) सिरिंज.
• 0.5 मिली/1 मिली/2 मिली/3 मिली डिस्पोजेबल सिरिंज.
• 1 मिली/2 मिली/3 मिली आरयुपी (रि-युज प्रिवेन्शन) सिरिंज.
कोणत्याही प्रकारच्या/सिरिंजच्या निर्यातीवर बंदी नाही, 3 महिन्यांच्या मर्यादित कालावधीसाठी विशिष्ट प्रकारच्या निर्दिष्ट सिरिंजच्या निर्यातीवर केवळ प्रमाणात्मक प्रतिबंध आहे असेही स्पष्ट केले आहे. वर नमूद केलेल्या श्रेणी आणि प्रकारांच्या सिरिंज वगळता इतर सिरिंज प्रमाणात्मक निर्बंधाखाली समाविष्ट नाहीत.
***
S.Tupe/V.Ghode/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1762444)
Visitor Counter : 275