आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारताच्या एकूण कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाने 93 कोटी मात्रांचा टप्पा केला पार


गेल्या 24 तासात 50.17 लाख मात्रांचे लसीकरण

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 97.96%, मार्च 2020 पासूनचा सर्वोच्च दर

गेल्या 24 तासात 21,257 नव्या कोरोना रुग्णांची नोंद.

उपचाराधीन रुग्णांची संख्या (2,40,221)   एकूण रुग्णसंख्येच्या 0.71%

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (1.64%) गेल्या 105 दिवसांपासून 3% पेक्षा कमी

Posted On: 08 OCT 2021 2:32PM by PIB Mumbai

 

गेल्या 24 तासात  50,17,753 मात्रांचे कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण झाल्याने भारताने 93 (93,17,17,191) कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे.

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार,   90,68,525 लसीकरण सत्रांच्या माध्यमातून या मात्रा देण्यात आल्या आहेत.

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:

 

HCWs

1st Dose

1,03,74,633

2nd Dose

89,78,960

 

FLWs

1st Dose

1,83,57,144

2nd Dose

1,52,22,373

 

Age Group 18-44 years

1st Dose

37,67,64,208

2nd Dose

9,56,87,462

 

Age Group 45-59 years

1st Dose

16,35,63,468

2nd Dose

8,09,12,829

 

Over 60 years

1st Dose

10,34,70,003

2nd Dose

5,83,86,111

Total

93,17,17,191

 

गेल्या 24 तासांत 24,963 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून ) वाढून 3,32,25,221 झाली आहे.

परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 97.96% झाला आहे. मार्च 2020 पासूनचा हा सर्वोच्च दर आहे.

केंद्र आणि राज्य सरकार / केंद्रशासित प्रदेश यांच्या एकत्रित प्रयत्नांचा परिणाम म्हणून सलग 103 दिवसांपासून 50,000 पेक्षा कमी नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद झाल्याचा कल कायम राहिला आहे.

गेल्या 24 तासात 21,257 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.

देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या 2,40,221 असून देशातील आतापर्यंतच्या एकूण बाधित रुग्णसंख्येच्या 0.71% आहे. तसेच ही रुग्णसंख्या गेल्या 205 दिवसातील निचांकी आहे.

देशभरात चाचण्यांची क्षमता वाढवली जात आहे. गेल्या 24 तासांमध्ये एकूण 13,85,706  चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 58 (58,00,43,190) कोटींहून अधिक चाचण्या घेतल्या आहेत.

देशभरात चाचणी क्षमता वाढवण्यात आली असताना, साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 1.64% असून गेल्या 105 दिवसांपासून हा दर 3% पेक्षा कमी राहिला आहे. दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 1.53% असून गेले सलग 39 दिवस हा दर 3 % पेक्षा कमी आहे आणि गेले सलग 122 दिवस हा दर 5% पेक्षा कमी आहे.

***

M.Chopade/V.Ghode/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1762085) Visitor Counter : 200