PIB Headquarters
पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र
Posted On:
07 OCT 2021 7:56PM by PIB Mumbai
नवी दिल्ली/मुंबई 7 ऑक्टोबर 2021




आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती
गेल्या 24 तासात 43,09,525 मात्रांचे कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण झाल्याने भारताने 92.63 (92,63,68,608) कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे.
आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार,90,14,182 लसीकरण सत्रांच्या माध्यमातून या मात्रा देण्यात आल्या आहेत.
गेल्या 24 तासांत 24,602 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून ) वाढून 3,32,00,258 झाली आहे.
परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 97.95% झाला आहे. मार्च 2020 पासूनचा हा सर्वोच्च दर आहे.
केंद्र आणि राज्य सरकार/केंद्रशासित प्रदेश यांच्या एकत्रित प्रयत्नांचा परिणाम म्हणून सलग 102 दिवसांपासून 50,000 पेक्षा कमी नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद झाल्याचा कल कायम राहिला आहे.
गेल्या 24 तासात 22,431 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.
देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या 2,44,198 असून देशातील आतापर्यंतच्या एकूण बाधित रुग्णसंख्येच्या 0.72% आहे. तसेच ही रुग्णसंख्या गेल्या 204 दिवसातील निचांकी आहे.
देशभरात चाचण्यांची क्षमता वाढवली जात आहे. गेल्या 24 तासांमध्ये एकूण 14,31,819 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 57.86 (57,86,57,484) कोटींहून अधिक चाचण्या घेतल्या आहेत.
देशभरात चाचणी क्षमता वाढवण्यात आली असताना, साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 1.68% असून गेल्या 104 दिवसांपासून हा दर 3% पेक्षा कमी राहिला आहे. दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 1.57% असून गेले सलग 38 दिवस हा दर 3 % पेक्षा कमी आहे आणि गेले सलग 121 दिवस हा दर 5% पेक्षा कमी आहे.
इतर अपडेट्स:-
- केंद्र सरकारने आतापर्यंत 93.94 (93,94,54,695) कोटींपेक्षा जास्त लसींच्या मात्रा राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना (मोफत) आणि थेट राज्याद्वारे खरेदी प्रक्रियेच्या अर्थात सर्व स्रोतांच्या माध्यमातून उपलब्ध केल्या आहेत. 7.64 (7,64,75,975) कोटी न वापरलेल्या उपयोगी मात्रा राज्ये आणि केन्द्र शासित प्रदेशांकडे शिल्लक आहेत.
- पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आज ऋषिकेश, उत्तराखंड येथे एम्समधे आयोजित एका कार्यक्रमात 35 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पीएम केअर्स अंतर्गत स्थापित 35 प्रेशर स्विंग ॲडॉर्सप्शन (पीएसए) ऑक्सिजन प्रकल्प समर्पित केले. यासह, देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये आता पीएसए ऑक्सिजन प्रकल्प कार्यान्वित होतील.
- महिला आणि बाल कल्याण मंत्रालयाने, पीएम केअर्स फॉर चिल्ड्रेन अर्थात मुलांसाठीच्या पीएम केअर्स योजनेसाठी तपशीलवार मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. कोविड-19 महामारीमुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांच्या व्यापक सहाय्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 29 मे 2021 ला याची घोषणा केली होती. कोविड महामारीत ज्या मुलांनी आपले पालक गमावले आहेत अशा मुलांना, निरंतर व्यापक काळजी आणि संरक्षण पुरवणे हा या योजनेचा उद्देश आहे. आरोग्य विम्याद्वारे त्यांचे कल्याण साधणे, शिक्षणाद्वारे त्यांना सबल करणे आणि 23 व्या वर्षी त्यांना वित्तीय सहाय्य पुरवत त्यांना स्वावलंबी करण्यासाठी ही योजना आहे.
S.Tupe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1761859)
अभ्यागत कक्ष : 211