गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सरकारचे प्रमुख म्हणून सार्वजनिक सेवेतील 20 वर्षे पूर्ण केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी केले अभिनंदन

Posted On: 07 OCT 2021 5:37PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 7  ऑक्टोबर 2021

सरकारचे  प्रमुख म्हणून सार्वजनिक सेवेतील 20 वर्षे  पूर्ण केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी  अभिनंदन  केले आहे. ट्वीट्स संदेशात अमित शहा म्हणाले की, "20 वर्षांपूर्वी आजच्याच  दिवशी नरेंद्र मोदी यांनी  गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि विकास आणि सुशासनाचा प्रवास तिथून सुरू झाला जो आजपर्यंत सुरू आहे. या 20 वर्षांमध्येनरेंद्र मोदी यांनी जनतेच्या आणि देशाच्या प्रगतीसाठी अहोरात्र मेहनत केली."

केंद्रीय गृह  आणि सहकार मंत्री म्हणाले की, राज्य सरकार आणि केंद्र सरकारचे प्रमुख म्हणून सार्वजनिक सेवेची 20 वर्षे पूर्ण केल्याबद्दल पंतप्रधान  नरेंद्र मोदीजी यांचे मी अभिनंदन करतो. गरीब आणि अंत्योदयांच्या कल्याणासाठी समर्पित या 20 वर्षांमध्ये, नरेंद्र मोदी यांनी  त्यांच्या प्रबळ इच्छाशक्तीने आणि काळाच्या पुढे जाऊन विचार करून अशक्य गोष्टी शक्य केल्या. "

अमित शहा म्हणाले की, हे माझे भाग्य आहे की मला प्रथम गुजरातमध्ये  आणि नंतर केंद्र सरकारमध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सरकार आणि संस्थेत काम करण्याची संधी मिळाली. मोदीजींच्या नेतृत्वाखाली मजबूत आणि स्वयंपूर्ण भारताचा संकल्प साकार करण्यासाठी आपण सर्वांनी आपले सर्वोत्तम योगदान देऊया ."

 

 M.Chopade/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1761792) Visitor Counter : 280