आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ई-संजीवनी सेवेद्वारे 1.3 कोटी लोकांनी आरोग्यविषयक सल्ला सुविधेचा लाभ घेतला


सुमारे 90,000 रुग्ण दररोज ई-संजीवनी सुविधेचा वापर करत आहेत

2022 सालापर्यंत आयुष्यमान भारत- आरोग्य आणि स्वास्थ्य केंद्र संलग्न ई-संजीवनी सुविधेच्या अंमलबजावणीची कार्यकक्षा वाढवून 1 कोटी 55 लाख आरोग्य आणि स्वास्थ्य केंद्रांना या उपक्रमाअंतर्गत जोडणार

Posted On: 04 OCT 2021 7:45PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 4 ऑक्टोबर 2021

 

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या ई-संजीवनी उपक्रमाने आज आरोग्यविषयक 1 कोटी 30 लाख सल्ले देण्याचा टप्पा पूर्ण केला. ई-संजीवनी हा भारत सरकारचा आरोग्यविषयक सल्ला उपलब्ध करून देणारा  टेलीमेडिसिन उपक्रम आहे. आरोग्य सेवा क्षेत्रातील डिजिटल मंच म्हणून हा उपक्रम हळूहळू भारतीय आरोग्य सेवा वितरण क्षेत्राला समांतर आरोग्यविषयक सेवा सुविधा म्हणून आकाराला येत आहे. आज सुमारे 90,000 रुग्ण दररोज ई-संजीवनी मंचाचा वापर करत आहेत. ई-संजीवनी मंचाचे दोन प्रकार कार्यरत आहेत- एक म्हणजे डॉक्टर ते डॉक्टर चर्चा आणि सल्ला सेवा तर दुसरा म्हणजे रुग्ण ते डॉक्टर सल्ला सेवा. या दोन्ही प्रकारांच्या वापरातून संपूर्ण देशभरात दुर्गम भागात देखील आरोग्याबाबत सल्ला मिळण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने नोव्हेंबर 2019 मध्ये सुरु केलेल्या आयुष्यमान भारत-आरोग्य आणि स्वास्थ्य केंद्र संलग्न ई-संजीवनी सुविधेअंतर्गत केंद्र सरकारच्या आयुष्यमान भारत योजनेतून डिसेंबर 2022 पर्यंत देशभरात ‘हब अँड स्पोक’ धर्तीवर 1,55,000 आरोग्य आणि स्वास्थ्य केंद्रे उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सध्या 27,000 आरोग्य आणि स्वास्थ्य केंद्रांमध्ये आयुष्यमान भारत- आरोग्य आणि स्वास्थ्य केंद्र संलग्न ई-संजीवनी सुविधा उपलब्ध आहे आणि त्यांना परिसरातील जिल्हा रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये इत्यादी 3000 केंद्रांतून सेवा दिली जाते.

देशभरात (13411325) ई-संजीवनी सेवा केंद्रे उभारून त्यांची सेवा उपलब्ध करून देण्याच्या बाबतीत आघाडीवर असलेली 10 राज्ये आणि या राज्यांमध्ये असलेली एकूण ई-संजीवनी सुविधा केंद्रे कंसात दिली आहेत. महाराष्ट्र (403376),  गुजरात (485735), आंध्रप्रदेश (4223054),  कर्नाटक (2415774), तामिळनाडू (1599283), उत्तर प्रदेश (1371799), मध्य प्रदेश (447878),  बिहार (436383), पश्चिम बंगाल (369441), आणि उत्तराखंड (271513).

eSanjeevani Consultations

Sr No.

04-Oct-21

TOTAL

eSanjeevaniAB-HWC

eSanjeevaniOPD

 

India

13411325

8033029

5378296

1

Andhra Pradesh

4223054

4200870

22184

2

Karnataka

2415774

987127

1428647

3

Tamil Nadu

1599283

131544

1467739

4

Uttar Pradesh

1371799

233572

1138227

5

Gujarat

485735

61131

424604

6

Madhya Pradesh

447878

442417

5461

7

Bihar

436383

413757

22626

8

Maharashtra

403376

317931

85445

9

West Bengal

369441

361475

7966

10

Uttarakhand

271513

662

270851

 

* * *

S.Tupe/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1760891) Visitor Counter : 193