संरक्षण मंत्रालय

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओ डेअर टू ड्रीम 2.0 आणि युवा वैज्ञानिक पुरस्कारांचे केले वितरण


राजनाथ सिंग यांनी भविष्यकाळातील तंत्रज्ञानासाठी संशोधन आणि विकास कार्य करण्याचे केले आवाहन

कोणत्याही आव्हानाचा सामना करण्यासाठी आपल्या संरक्षण दलांना अत्याधुनिक यंत्रसामग्रीने सुसज्जित करणे हे आपले उद्दिष्ट आहे : संरक्षण मंत्री

Posted On: 04 OCT 2021 4:23PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 4 ऑक्टोबर 2021

महत्त्वाचे मुद्दे :

  • स्वदेशी पध्दतीने विकसित केलेल्या तीन तंत्रज्ञानांचे सशस्त्र दलांकडे हस्तांतरण 
  • डीआरडीओ अर्थात संरक्षणविषयक संशोधन आणि विकास संस्थेद्वारे निर्देशित संशोधन विषयक धोरण आणि नोंदी व्यवस्थापन धोरणाची सुरुवात 
  • डीआरडीओ आणि शिक्षणक्षेत्र यांच्यातील नातेसंबंध अधिक वाढविण्यावर भर देण्यात आला
  • केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग म्हणाले की राष्ट्रीय सुरक्षा आणि एकंदर विकास प्रक्रिया मजबूत  करण्यासाठी नव्या स्वदेशी तंत्रज्ञानाचे विकसन आवश्यक आहे

संरक्षण मंत्री श्री राजनाथ सिंग यांनी आज 04 ऑक्टोबर 2021 रोजी नवी दिल्ली येथे संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेद्वारे आयोजित करण्यात आलेल्या ‘डेअर टू ड्रीम 2.0’ या स्पर्धेच्या विजेत्यांना सन्मानित केले. संरक्षण मंत्र्यांनी व्यक्तिगत विभागातील 22 आणि स्टार्ट अप विभागातील 18 अशा एकूण 40 विजेत्यांना पारितोषिके प्रदान केली.  देशातील नाविन्यपूर्ण संशोधन करणाऱ्या संशोधकांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि प्रज्वलित युवा मनांना त्यांच्या कार्यासाठी मंच उपलब्ध करून देण्याच्या हेतूने या प्रसंगी त्यांनी ‘डेअर टू ड्रीम 3.0’ या स्पर्धेची देखील घोषणा केली.

भारतीय शिक्षणतज्ञ, व्यक्ती आणि स्टार्ट अप्स यांना संरक्षण आणि अवकाश विषयक उदयोन्मुख तंत्रज्ञान/ प्रणालीचे विकसन करण्यासाठी उत्तेजन देण्याच्या उद्देशाने डीआरडीओने संपूर्ण भारतभरात या  डेअर टू ड्रीम स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेतील विजेत्यांनी मांडलेल्या संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी डीआर’डीओ त्यांना  टीडीएफ अर्थात तंत्रज्ञान विकास निधी योजनेंतर्गत तंत्रज्ञानविषयक आणि आर्थिक पाठबळ पुरवीत आहे.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी या कार्यक्रमात 2019 या वर्षासाठीच्या युवा संशोधक पारितोषिकांचे देखील वितरण केले. या कार्यक्रमात  डीआरडीओ मध्ये कार्यरत असलेल्या 35 वर्षांखालील 16 युवा संशोधकांना त्यांच्या क्षेत्रातील अभूतपूर्व योगदानासाठी पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले.

 

* * *

M.Iyengar/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1760817) Visitor Counter : 442