जलशक्ती मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

स्वातंत्र्याच्या  अमृत महोत्सवाचा भाग म्हणून देशभरात 15 सप्टेंबर - 2 ऑक्टोबर 2021 दरम्यान  'स्वच्छता ही सेवा'  साजरा करण्यात आला

Posted On: 02 OCT 2021 9:20PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणादायी नेतृत्वाखाली केंद्र  सरकार भारताच्या स्वातंत्र्याची 75 वर्षे आणि  इथल्या  लोकांचा गौरवशाली इतिहास, संस्कृती आणि सामुदायिक  पुढाकारासह स्वातंत्र्याचा  अमृत महोत्सव  साजरा करत आहे. स्वातंत्र्याचा  अमृत महोत्सव या महत्वाकांक्षी अभियानांतर्गत जलशक्ती मंत्रालयाचा  पेयजल आणि स्वच्छता विभागाने स्वच्छ भारत मिशन ग्रामीण (SBMG) टप्पा  दोन अंतर्गत गावांमध्ये उघड्यावरील शौचापासून मुक्त -ODF प्लस उपक्रमांना गती देण्यासाठी आणि ओडीएफ मुक्तीचे सातत्य कायम राखण्यासाठी  महत्त्वपूर्ण उपक्रमांचे आयोजन केले.

  • सत्याग्रह से स्वच्छाग्रह रथ यात्रा: 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2021
  • स्वच्छता ही सेवा: 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2021
  • स्वच्छता संवाद: 15 ऑगस्ट 2021 ते 15 ऑगस्ट 2022
  • स्थायित्व एवं सुजलाम अभियान 100 दिवसांचे अभियान: 25 ऑगस्ट 2021 पासून

स्वच्छता ही सेवा पंधरवड्यादरम्यान, स्वच्छता रथलाही हिरवा कंदील , स्वच्छता श्रमदान, स्वच्छता जागृती यात्रा (रॅली), स्वच्छता चॅम्पियन्स पुरस्कार , एकदा वापरायच्या प्लास्टिकवर बंदी  घालण्याबाबत  ग्रामसभेचा  ठरावग्रामपंचायतींच्या  निवडून आलेल्या  प्रतिनिधींशी (ग्राम प्रधान/सरपंच) संवाद सारख्या सामुदायिक सहभागाला  प्रोत्साहन देण्यासाठी अनेक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. स्वच्छता ही सेवा मोहिमेचा आज म्हणजेच 2 ऑक्टोबर, 2021 रोजी देशभरातील राज्ये आणि जिल्ह्यांद्वारे स्वच्छ भारत दिवस साजरा करून समारोप झाला.

स्वच्छता ही सेवा 2021 पंधरवड्यात, स्वच्छता श्रमदानात 60 लाखांहून अधिक लोकांनी भाग घेतला आणि योगदान दिले, 1.5 लाखांहून अधिक श्रमदान उपक्रम आयोजित केले गेले,एकदा वापरायच्या प्लास्टिकवर बंदीच्या ठरावासाठी 43,000 हून अधिक ग्रामसभा आयोजित करण्यात आल्या आणि सुमारे 783 स्वच्छता रथांना देशभरात जिल्हा आणि राज्यांतून रवाना  करण्यात आले.  या पंधरवड्यात द्रवरूप कचरा व्यवस्थापन पायाभूत उपक्रमांचे  देखील लक्षणीय परिणाम दिसले ज्यात सुमारे 15951 वैयक्तिक आणि 7216 सामुदायिक शोष  खड्डे  बांधले गेले.

स्वच्छता ही सेवा 2021 मोहिमेची सुरुवात 15 सप्टेंबर रोजी राज्य आणि जिल्हा स्तरावर प्रभारी राज्य मंत्री (ग्रामीण स्वच्छता), राज्य एसबीएमजी मिशन संचालक, विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि जिल्हाधिकारी/मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद आणि  जिल्हास्तरावरील इतर  आणि गावांमधील निवडून आलेले लोकप्रतिनिधी , समुदाय सदस्य. यांनी केली. जलशक्ती मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी 17 सप्टेंबर 2021 रोजी ओडीएफ प्लस बाबत तसेच  आयईसी रथद्वारे  व्यापक स्वच्छतेबाबत  जनजागृती करण्यासाठी  मध्य प्रदेशच्या दमोह जिल्हा येथील जाररुधाम जीपी इथून  स्वच्छता रथाला झेंडा दाखवून एसएचएस मोहिमेत सहभागी झाले.  त्यांनी उपस्थितांना संबोधित केले आणि मध्य प्रदेशचे राज्यमंत्री (महसूल आणि परिवहन), यांच्यासह स्वच्छता संगोष्टीला उपस्थित राहिले. केंद्रीय राज्यमंत्र्यांनी  ग्रे वॉटर मॅनेजमेंट (GWM), बायोडिग्रेडेबल वेस्ट मॅनेजमेंट (BWM), प्लास्टिक कचरा व्यवस्थापन (PWM), मल कचरा व्यवस्थापन आणि गोबरधन या प्रमुख ओडिएफ  प्लस घटकांसंदर्भात  योग्य वर्तन आणि कृती करण्यासाठी सदस्यांना  प्रोत्साहित केले. (एफएसएम).

स्वच्छता ही सेवा 2021 मोहिमेने संपूर्ण राष्ट्राला पुन्हा एकदा मजबूत बनवले आणि उघड्यावरील शौचापासून मुक्तीचे  ध्येय साध्य करण्यासाठी ग्रामीण भारतामध्ये व्यापक स्वच्छता/संपूर्ण स्वच्छतेचा  संकल्प करणारी जन चळवळ/जनआंदोलन मजबूत केले.

SHS 2021 चित्रपट: https://www.youtube.com/watch?v=dOn3MQ2mJFU

***

G.Chippalkatti/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1760467) Visitor Counter : 295


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil