उपराष्ट्रपती कार्यालय

स्टार्ट-अपनी वृद्धांना भेडसावणाऱ्या समस्यांवर नाविन्यपूर्ण आणि चाकोरीबाहेचे उपाय शोधावे -उपराष्ट्रपती


ज्येष्ठ नागरिकांना रोजगार देऊन त्यांच्या कौशल्यांचा आणि अनुभवाचा लाभ घेण्याचे उपराष्ट्रपतींचे खासगी क्षेत्राला आवाहन

वृद्धांसाठी SACRED पोर्टल आणि ‘एल्डर लाइन’ हेल्पलाइनची उपराष्ट्रपतींनी केली सुरुवात

Posted On: 01 OCT 2021 6:35PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 1 ऑक्टोबर 2021

 

स्टार्ट-अपनी वृद्धांना भेडसावणाऱ्या दैनंदिन समस्यांवर नाविन्यपूर्ण आणि चाकोरीबाहेचे उपाय शोधण्याचे आवाहन उपराष्ट्रपती एम. वेंकैया नायडू यांनी देशातील युवा स्टार्ट-अप ना केले. ते म्हणाले की वृद्धांची काळजी घेणे ही केवळ सरकारची जबाबदारी नाही तर आपल्यापैकी प्रत्येकाने पुढे येऊन या उदात्त कार्यात सामील झाले पाहिजे.

आज नवी दिल्लीच्या विज्ञान भवनात वयोश्रेष्ठ सन्मान -2021 हे राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केल्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना उपराष्ट्रपती म्हणाले की आमच्या ज्येष्ठ नागरिकांना 'वृद्ध व्यक्ती' म्हणण्यापेक्षा 'वडीलधारे' म्हणणे ते पसंत करतील.

   

या कार्यक्रमात, उपराष्ट्रपतींनी ज्येष्ठ नागरिकांना खासगी क्षेत्रातील नियोक्त्यांशी जोडण्यासाठी SACRED (वरिष्ठ सक्षम नागरिकांच्या गौरवयुक्त  पुनः रोजगारासाठी) पोर्टल सुरू केले. LASI अहवाल -2020 चा संदर्भ देत ते म्हणाले की, 50% पेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिक सक्रिय आहेत आणि म्हणूनच त्यांच्या आनंदी, निरोगी, सशक्त आणि आत्मनिर्भर जीवनासाठी रोजगाराच्या फायदेशीर संधी उपलब्ध करून देणे अत्यंत महत्वाचे आहे. आपले वडीलधारी हे अनुभवाचे आणि तज्ज्ञतेचे विशाल भांडार आहेत यावर प्रकाश टाकत त्यांनी खासगी क्षेत्राला नवीन पोर्टलमध्ये सामील होण्याचे आणि आपल्या ज्येष्ठ नागरिकांच्या कौशल्यांचा आणि अनुभवाचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

    

श्री नायडू यांनी पुरस्कार सोहळ्यादरम्यान एक राष्ट्रीय हेल्पलाइन (एल्डर लाइन) देखील सुरू केली. ज्येष्ठ नागरिक हा अत्यंत असुरक्षित गट आहे हे लक्षात घेऊन, उपराष्ट्रपतींनी त्यांच्या संरक्षणासाठी एक सुलभ आणि कार्यक्षम तक्रार निवारण यंत्रणा सुरू करण्यासाठी हेल्पलाइनचे कौतुक केले. सरकारने टाटा ट्रस्टच्या सहकार्याने स्थापन केलेली हेल्पलाईन देशभरातील ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी दिवसाचे 12 तास काम करेल.

 

* * *

M.Chopade/V.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1760068) Visitor Counter : 237