आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड-19 बाबतची अद्ययावत माहिती
Posted On:
01 OCT 2021 11:24AM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 ऑक्टोबर 2021
देशव्यापी लसीकरण मोहिमेत आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लसीच्या 89.02 कोटी मात्रा देण्यात आल्या आहेत.
गेल्या 24 तासात 26,727 नव्या रुग्णांची नोंद झाली
सक्रीय रूग्णसंख्या एकूण रुग्णसंख्येच्या 1% पेक्षा कमी झाली असून सध्या ती 0.82% आहे आणि मार्च 2020 पासून हि सर्वात कमी रुग्णसंख्या आहे.
सक्रिय रुग्णसंख्या 2,75,224 असून गेल्या 196 दिवसांतील सर्वात कमी रूग्णसंख्या आहे.
रोगमुक्ती दर सध्या 97.86% आहे; मार्च 2020 पासून सर्वात उच्च दर आहे.
गेल्या 24 तासात 28,246 रूग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यामुळे कोविडमुक्त रूग्णांची संख्या 3,30,43,144 इतकी झाली आहे.
साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर (1.70%) गेल्या 98 दिवसात 3% हून कमी
दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर (1.76%) असून गेले 32 दिवस 3% हून कमी
आतापर्यंत देशभरात कोविड संसर्ग तपासणीच्या एकूण 57.04 कोटी चाचण्या करण्यात आल्या आहेत.
Jaydevi PS/S.Patgaonkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1759893)
Visitor Counter : 219