रसायन आणि खते मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रीय औषधनिर्माण दर प्राधिकरणाकडून औषध कंपन्यांच्या गैरव्यवहाराशी संबंध असल्याच्या खोट्या वक्तव्याचा केला निषेध

Posted On: 29 SEP 2021 5:05PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 29 सप्‍टेंबर 2021

 

राष्ट्रीय औषधनिर्माण दर प्राधिकरण- NPPA ही भारत सरकारच्या रसायन आणि खते मंत्रालयाअंतर्गत औषधनिर्माण विभागाची नियामक संस्था आहे, जी सूचिबद्ध औषधांच्या किमती नियंत्रित करून  परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देते तसेच बिगर-सूचिबद्ध औषधांच्या किमतींवर देखरेख ठेवते.

आपल्या 22 सप्टेंबर, 2021 च्या अंकात जम्मू औषध वितरक संघटनेच्या हवाल्याने द डेली एक्सल्सिअरने, औषध निर्मात्या कंपन्या, राष्ट्रीय औषधनिर्माण दर प्राधिकरणाशी संगनमत करून,  समान किंमत असूनही बहुतांश औषधे विविध क्षेत्रात वेगवेगळ्या किमतींना विकत असल्याचा गैरव्यवहार सुरु असल्याचे वृत्त दिले होते.

औषधनिर्मात्या करत असलेल्या अशा प्रकारच्या कुठल्याही गैरव्यवहारांशी एनपीपीएचा संबंध असल्याच्या चुकीच्या विधानाचा एनपीपीए तीव्र निषेध करत आहे. इथे हे ही नमूद करणे संयुक्तिक होईल की, औषधांच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी घालून दिलेल्या मर्यादेपलीकडे, जर कोणी औषधे विकत असतील, तर  त्याविरोधात एनपीपीए मार्फत औषध मूल्य नियंत्रण आदेश (DPCO), 2013 नुसार कारवाई केली जाते.

त्याशिवाय, लागू असलेल्या मर्यादेपेक्षा/एमआरपी पेक्षा कमी किमतीला औषधनिर्माण कंपन्यांकडून औषधे विकली जात असतील, तर ही बाब एनपीपीए च्या कार्यकक्षेत येत नाही. ज्या कंपन्या एनपीपीए च्या कार्यकक्षेत येत नाहीत, त्यांच्याकडून, व्यावसायिक पातळीवर या गोष्टी केल्या जातात.

 

* * *

Jaydevi PS/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1759303) Visitor Counter : 120


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu