गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या (एनडीएमए) 17 व्या स्थापना दिनानिमित्त नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी

Posted On: 28 SEP 2021 10:05PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 28  सप्टेंबर 2021

अमित शाह यांनी आपदा मित्र योजनेची  प्रशिक्षण नियमावली आणि  आपदा मित्र योजनेच्या दस्तावेजांचे आणि  व सामायिक पूर्वसूचना प्रोटोकॉलचे  (Common Alerting Protocol) प्रकाशन केले.

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन  प्राधिकरणच्या  (एनडीएमए) 17 व्या  स्थापना दिनानिमित्त आज नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी झाले होते. यावर्षीच्या स्थापना दिनाची संकल्पना  ‘हिमालयीन क्षेत्रात  वाढत्या आपत्तींचा  प्रभाव’ अशी आहे. यावेळी अमित शाह यांनी आपदा मित्र योजनेची  प्रशिक्षण नियमावली आणि  आपदा मित्र व सामायिक पूर्वसूचना प्रोटोकॉल  योजनेच्या दस्तावेजांचे प्रकाशन केले.

आपल्या भाषणात केंद्रीय  गृह आणि सहकार  मंत्री म्हणाले की एनडीएमए आणि तिची अंमलबजावणी संस्था म्हणून राष्ट्रीय आपत्ती  निवारण दल आणि राज्य आपत्ती  निवारण दलाने गेल्या  17 वर्षांमध्ये देशाचा  आपत्ती व्यवस्थापन  इतिहास बदलण्याचे आणि संपूर्ण देशाची संवेदनशीलता आपत्ती व्यवस्थापनाशी जोडण्याचे काम केले आहे आणि ही खूप मोठी कामगिरी आहे. ते म्हणाले की  130 कोटी लोकसंख्या असलेल्या देशात , जिथे प्रत्येक राज्यात वेगवेगळे हवामान अनेक नद्या , डोंगर , लांब समुद्र किनारे आहेत, अशा स्थितीत जर आपण  जनता आणि समाजाची  संवेदनशीलता, आपत्तींपासून वाचण्यासाठी वैज्ञानिक व्यवस्थांचा प्रारंभ आणि या व्यवस्थाचा  तळागाळापर्यंत स्वीकार करण्याची  मानसिकता तयार करू शकलो नाही तर आपल्याला मोठया प्रमाणात जीवित हानी आणि पायाभूत सुविधांच्या हानीला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी लागेल. मात्र या  17 वर्षांमध्ये या क्षेत्रात खूप बदल झाला आहे.

एनडीएमए द्वारा सुरु करण्यात आलेले दोन उपक्रम-आपदा मित्र आणि सामायिक पूर्वसूचना प्रोटोकॉल याबाबत बोलताना ते म्हणाले की आपदा मित्र योजना खूपच  महत्वपूर्ण आहे.  एनडीएमएने  जगभरात आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी झालेले संशोधन किंवा सर्वोत्तम पद्धतींचा अभ्यास करायला हवा आणि आपल्या देशातील  परिस्थिती आणि आव्हानांनुसार त्या  परिवर्तित करून एका कृतीयोजनेत रूपांतर करून लोकांपर्यंत घेऊन जायला  हवे असे ते म्हणाले.

 

M.Chopade/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1759097) Visitor Counter : 232