माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

लेह येथे पहिल्या हिमालयीन चित्रपट महोत्सवाच्या समारोप सोहळ्याला माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव उपस्थित

Posted On: 28 SEP 2021 9:47PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 28  सप्टेंबर 2021

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव  अपूर्व चंद्रा आज लडाख  केंद्रशासित प्रदेशमधील लेह इथल्या  सिंधु संस्कृती केंद्रयेथे पाच दिवस चाललेल्या  'पहिल्या हिमालयीन चित्रपट महोत्सवा'च्या समारोप समारंभाला उपस्थित होते. पाच दिवस चाललेला हा  चित्रपट महोत्सव  भारताच्या स्वातंत्र्याच्या 75   वर्षानिमित्त साजरा केला जात असलेल्या  अमृत महोत्सवाचा भाग आहे.

 

आपल्या भाषणात अपूर्व चंद्रा म्हणाले की, हा 'चित्रपट महोत्सव' सर्जनशीलता आणि मनोरंजन क्षेत्रातील सर्वोत्कृष्टतेसाठी एक सुयोग्य  व्यासपीठ म्हणून उदयाला आला आहे. 'चित्रपट महोत्सव' स्थानिक चित्रपट निर्मात्यांना त्यांच्या कथा जागतिक स्तरावर  मोठ्या प्रेक्षकवर्गासमोर मांडण्याची संधी देतात.

या कार्यक्रमात बोलताना सचिव म्हणाले की, लडाख प्रदेशातील विशिष्ट भौगोलिक परिस्थिती चित्रपट निर्मात्यांचे पसंतीचे आकर्षण राहिली आहे आणि अनेक प्रसिद्ध चित्रपटांचे चित्रीकरण या प्रदेशात करण्यात आले आहे.

महोत्सवादरम्यान प्रदर्शित करण्यात आलेल्या चित्रपटांसाठी लडाखच्या युवा  चित्रपट निर्मात्यांचे कौतुक करताना ते  म्हणाले की, हिमालयीन प्रदेशातील युवा चित्रपट निर्माते सर्वात प्रतिभावान असून त्यांच्या चित्रपटांमधून त्याची झलक पहायला मिळाली.

सचिव म्हणाले की हा चित्रपट महोत्सव लडाखच्या युवा  चित्रपट निर्मात्यांसाठी एक चांगला अनुभव ठरला असेल. जगातील प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शकांच्या उपस्थितीत  या अल्पावधीत त्यांना मास्टर क्लास, विविध स्पर्धांमध्ये भाग घेण्याची संधी मिळाली.

यावेळी सचिवांनी केंद्रशासित प्रदेश प्रशासनाला इतर राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या धर्तीवर चित्रपट धोरण आखण्याची  विनंती केली जेणेकरून छोट्या चित्रपट  निर्मात्यांना प्रोत्साहन मिळू शकेल आणि संपूर्ण भारतभरातील चित्रपट निर्मात्यांना देखील आकर्षित करता येईल.  लडाखमधील वन्यजीवन  हे देश आणि जगभरातील चित्रपट निर्मात्यांसाठी सर्वोत्तम आकर्षण ठरू शकते असेही त्यांनी नमूद केले.

ओटीटी प्लॅटफॉर्मचे महत्त्व सांगताना सचिव म्हणाले की, ओटीटी प्लॅटफॉर्म युवा  प्रतिभेला भरपूर संधी देऊ शकतात आणि चित्रपट निर्मितीमध्ये त्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांद्वारे या ओटीटी प्लॅटफॉर्मचा सर्वोत्तम वापर करू शकतात.

 

 

 

 

M.Chopade/S.Kane/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1759091) Visitor Counter : 245