गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

जनप्रथम हा गाभा असलेल्या आझादी@75:स्वच्छ सर्वेक्षण 2022 ला आरंभ


जागतिक पातळीवरील सर्वात मोठ्या स्वच्छता सर्वेक्षणाच्या सातवी फेरीचे लक्ष्य असेल स्वच्छता कर्मचाऱ्यांचे कल्याण

Posted On: 27 SEP 2021 6:45PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 27 सप्‍टेंबर 2021


केंद्रीय घरबांधणी व शहरी कामकाज मंत्री हरदीपसिंग पुरी यांच्या हस्ते जगातील सर्वात मोठ्या शहरी स्वच्छता मोहिमेचे आज नवी दिल्ली येथे उद्घाटन झाले. स्वच्छ भारत योजना-शहरी (SBM-U) कडून होणार असलेल्या स्वच्छ सर्वेक्षणाच्या सलग  सातव्या फेरीचा आरंभ झाला.

‘जनप्रथम’ हे उद्दिष्ट असलेले स्वच्छ सर्वेक्षण 2020 कर्मचाऱ्यांचे कल्याण आणि आरोग्य यासंबधी शहरांचा पुढाकार यावर भर देणारे असेल. आझादी@75 चा उत्साह असलेले हे सर्वेक्षण जेष्ठ नागरिक व नवतरुणांच्या मतांना सारखाच अग्रक्रम देईल आणि शहरी भागात स्वच्छता राखण्याच्या कामात त्यांनाही सहभागी करून घेईल.

स्वच्छता सर्वेक्षण 2022चे उद्दिष्ट हे ज्येष्ठांच्या अनुभवाला वाव देत सर्वेक्षणाचा अविभाज्य भाग म्हणून ज्येष्ठ नागरिकांच्या प्रतिक्रिया मिळवण्याचे असेल. मतमतांतराला वाव देत स्वच्छता सर्वेक्षण 2022 देशाचे भावी नेतृत्व असणाऱ्या नवतरूणांचेही मत जाणून घेईल. त्याशिवाय भारताची पुरातन परंपरा आणि संस्कृती यांचे संरक्षण करण्यासाठी भारताच्या शहरी भागात आढळणारी भारताची स्मृतीचिन्हे व वारसा स्थळे यांच्या स्वच्छतेची जबाबदारी लोकांनी स्वतःहून उचलावी म्हणून  प्रेरीत करेल.

All documents released today are available on www.swachhbharaturban.gov.in

For regular updates, please follow the Swachh Bharat Mission’s official social media properties:

Facebook Swachh Bharat Mission - Urban | Twitter - @SwachhBharatGov

* * *

M.Chopade/V.Sahajrao/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1758650) Visitor Counter : 328