आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

आंतरराष्ट्रीय कर्णबधिर सप्ताह  2021 अंतर्गत केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री  डॉ.भारती प्रविण पवार  यांच्या अध्यक्षतेखाली  नवी दिल्लीत कार्यक्रम ,“ कर्णबधिर समुदायाची उन्नती ”  ही या वर्षीची संकल्पना


विविध आजार आणि व्यंगांसाठी लहान मुलांची तपासणी अनिवार्य असायला हवी : डॉ भारती प्रविण पवार

Posted On: 24 SEP 2021 4:13PM by PIB Mumbai

 

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती प्रविण पवार यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथे केंद्रीय आरोग्य शिक्षण विभाग येथे आंतरराष्ट्रीय कर्णबधिर सप्ताह  2021 चे आयोजन करण्यात आले होते.  केंद्रीय आरोग्य मंत्रालयाअंतर्गत आरोग्य सेवा महासंचालनालय हितधारकांच्या सहभागासह विविध उपक्रमांद्वारे या विषयावर जागरूकता निर्माण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय कर्णबधिर सप्ताह (IWDP) 2021 पाळत आहे. कर्णबधिर समुदायाची उन्नती ही यावर्षीची संकल्पना आहे.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image002VWPH.jpg

या कार्यक्रमात बोलताना डॉ भारती पवार यांनी भारतात सुमारे 9 कोटी लोक श्रवण विषयक विकाराने त्रस्त असल्याबद्दल  चिंता व्यक्त केली.  आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत, तेव्हा आपण आपल्या गावांमध्ये जाऊन मुलांना विविध आजारांची तपासणी करण्यासाठी मदत करू शकतो का ते पाहायला हवे असे त्या म्हणाल्या.  लवकर निदान आणि अपंगत्वाला  प्रतिबंध करण्याचे अनेक फायदे आहेत. विविध आजार आणि व्यंगांबाबत   लहान मुलांची तपासणी अनिवार्य करायला हवी , उपचारापेक्षा प्रतिबंध अधिक चांगला असेही त्यांनी नमूद केले.

पंतप्रधानांच्या दूरदर्शी नेतृत्वाप्रति  मनापासून कृतज्ञता व्यक्त करताना, डॉ भारती पवार म्हणाल्या , पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली, आपण  जगाला हे सिद्ध करून दाखवले आहे की भारत हा  असा देश आहे जो स्वतः औषध निर्मिती  करू शकतो आणि दररोज 1-2 कोटी लसीच्या मात्राही देऊ शकतो. कर्णबधिर मुलांना श्रवणयंत्र आणि इम्प्लांट सामुग्री भेट देऊन वाढदिवस साजरा करण्यासाठी त्यांनी लोकांना प्रोत्साहित केले.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image004VJX3.jpg

आपल्या लहानपणाचे  एक उदाहरण देत नवजात बालकांची  मुलांची काळजी घेण्याच्या जुन्या परंपरा पुनरुज्जीवित करण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला. तसेच गर्भवती मातेची  काळजी घेणे महत्वाचे आहे, असे त्या म्हणाल्या. त्यांनी  क्यूआर कोडसह एक पॉकेट बुक तयार करण्याची सूचना केली ज्यात बालकांची  लवकर तपासणी आणि निदान तसेच विविध हेल्पलाईन्सची माहिती असेल.  हे पॉकेट बुक आशा, अंगणवाडी सेविका आणि रुग्णालयांच्या इतर कर्मचाऱ्यांसोबत सामायिक करता येऊ शकेल. आयुष्मान भारत सारख्या विविध सरकारी योजनांविषयी जनजागृती करण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला जेणेकरून लोकांना जास्तीत जास्त लाभ मिळतील.

आंतरराष्ट्रीय कर्णबधिर सप्ताह सर्वप्रथम 1958 मध्ये रोम, इटली येथे पाळण्यात आला.  जागतिक कर्णबधिर समुदायाद्वारे दरवर्षी सप्टेंबरच्या शेवटच्या संपूर्ण आठवड्यात तो साजरा केला जातो . याच महिन्यात  जागतिक कर्णबधिर महासंघाची पहिली जागतिक परिषद आयोजित करण्यात आली होती. आंतरराष्ट्रीय कर्णबधिर सप्ताह जगभरातील कर्णबधिर समुदायांद्वारे विविध उपक्रमांच्या माध्यमातून साजरा केला जातो.

डॉ. सुनील कुमार, डीजीएचएस, डॉ. कंवर सेन, प्रमुख सल्लागार, डीजीएचएस, डॉ.अनिल कुमार, डीडीजी, डीजीएचएस आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे इतर वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

***

N.Chitale/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1757707) Visitor Counter : 239