आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
आयुष्मान भारतच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी आरोग्य मंथन 3.0 चे केले उद्घाटन
देशभरात प्राथमिक आणि द्वितीय स्तरावरच्या आरोग्य सुविधांना नव चैतन्य देण्याची या योजनेत अपार क्षमता : डॉ भारती प्रवीण पवार
प्रविष्टि तिथि:
23 SEP 2021 9:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 सप्टेंबर 2021
आयुष्मान भारत – प्रधान मंत्री जन आरोग्य योजना ( एबीपीएम-जेएवाय)योजनेच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित आरोग्य मंथन 3.0 च्या प्रारंभ सत्राचे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री मनसुख मांडवीय यांनी उद्घाटन केले. आयुष्मान भारत – प्रधान मंत्री जन आरोग्य योजनेच्या अंमलबजावणीची देशभरातली तीन यशस्वी वर्षे साजरी करण्यासाठी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्य मंत्री डॉ भारती प्रवीण पवार उपस्थित होत्या.

पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी 23 सप्टेंबर 2018 ला रांची इथून आयुष्मान भारत पीएम-जेएवाय ची सुरवात केली. सेवा आणि सर्वोत्कृष्टता ही या कार्यक्रमाची संकल्पना आहे. आयुष्मान भारत दिवस साजरा करत आरोग्य मंथन 3.0 या चार दिवसीय कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. हा कार्यक्रम मिश्र म्हणजे प्रत्यक्ष उपस्थिती आणि दुरदृष्य प्रणाली अशा दोनही स्वरुपात होणार आहे.

एबीपीएम-जेएवाय ने देशभरातल्या संपूर्ण आरोग्य यंत्रणेत सुधारणा घडवून आणल्याचे मांडवीय यांनी सांगितले. गेल्या तीन वर्षात दुर्गम आणि दुरदुरच्या भागातल्या भागातल्या 2.2 कोटी लोकांची सेवा या योजनेद्वारे आल्याचे सांगताना आपल्याला अतिशय आनंद होत असल्याचे ते म्हणाले. या योजनेच्या अंमलबजावणीचा तीन वर्षांचा प्रवास विलक्षण राहिला असल्याचे सांगून लाखो भारतीय नागरिकांना आरोग्याचा अधिकार देऊन सबल केल्याचे ते म्हणाले.

यावेळी त्यांनी हॉस्पिटल हेल्प डेस्क किओस्क, लाभार्थी सुविधा एजन्सी, पीएमजेएवाय कमांड सेंटर आणि पुनर्रचित पीएमजेएवाय तंत्रज्ञान मंच या उपक्रमांचे उद्घाटन केले. ज्यायोगे, या योजनेतल्या लाभार्थींना आरोग्य सुविधांचा सुलभपणे लाभ घेता यावा या दृष्टीने राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने हे काम हाती घेतले होते.


भारतातली आरोग्य व्यवस्था सुधारण्यात एबी-पीएमजेएवायची भूमिका डॉ भारती पवार यांनी अधोरेखित केली. देशभरातल्या प्राथमिक आणि द्वितीय स्तरावरच्या आरोग्य सुविधांना नव चैतन्य देण्याची या योजनेत अपार क्षमता असल्याचे त्यांनी सांगितले. आरोग्य मंथन 3.0 ची या वर्षीची संकल्पना सेवा आणि सर्वोत्कृष्टता असून मोफत, सुलभ आणि दर्जेदार वैद्यकीय सुविधेसह 54 कोटीपेक्षा जास्त लक्षित लोकांच्या सेवेसह एबी-पीएमजेएवाय हे उदात्त कार्य पूर्ण करत आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमाची लिंक : https://youtu.be/gy35VaFGNB4
M.Chopade/N.Chitale/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1757455)