युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रपती रामनाथ कोविंद उद्या आभासी पद्धतीने 2019-20 साठीचे राष्ट्रीय सेवा योजना ( NSS) पुरस्कार प्रदान करणार


केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर आणि युवक व्यवहार व क्रीडा राज्यमंत्री निशिथ प्रामाणिक देखील उपस्थित राहणार

Posted On: 23 SEP 2021 7:31PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 23  सप्टेंबर 2021

ठळक वैशिष्ट्ये :

  • 2019-20 साठीचे राष्ट्रीय सेवा योजना (NSS) पुरस्कार  विद्यापीठ/ +2 परिषदा, NSS युनिट्स आणि त्यांचे कार्यक्रम अधिकारी आणि NSS स्वयंसेवक  अशा 3 श्रेणींमध्ये दिले जाणार असून त्यासाठी 42 जणांची निवड झाली आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद 24 सप्टेंबर , 2021 रोजी  2019-20 साठीची राष्ट्रीय सेवा योजना (NSS) पुरस्कार नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवन येथून आभासी पद्धतीने प्रदान करणार आहेत. केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर आणि  युवक व्यवहार व क्रीडाराज्यमंत्री निशिथ  प्रामाणिक नवी दिल्लीच्या सुषमा स्वराज भवन येथून उपस्थित राहणार आहेत. २०१९-२० साठीचे राष्ट्रीय सेवा योजना (NSS) पुरस्कार  विद्यापीठ/ +२ परिषदा, NSS युनिट्स आणि त्यांचे कार्यक्रम अधिकारी,  आणि NSS  स्वयंसेवक  अशा ३ श्रेणींमध्ये दिले जाणार असून त्यासाठी ४२ जणांची निवड झाली आहे.

देशभरातील विद्यापीठे/ महाविद्यालये, (+2) परिषद, उच्च माध्यमिक विद्यालये, NSS युनिट्स / कार्यक्रम अधिकारी आणि NSS स्वयंसेवक यांनी स्वैच्छिक समाजसेवेसाठी दिलेल्या विशेष योगदानाला मान्यता देऊन पुरस्कृत करण्यासाठी  केंद्रीय युवक व्यवहार व क्रीडा मंत्रालयातर्फे   राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कार  दरवर्षी दिले जातात. यातून राष्ट्रीय सेवा योजनेला आणखी प्रोत्साहन मिळते. NSS ही एक केंद्रीभूत क्षेत्रीय योजना असून तिची सुरुवात 1969 साली झाली. स्वैच्छिक समाजसेवेच्या माध्यमातून युवा विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व व चारित्र्य विकास व्हावा, हा  या योजनेमागचा मूळ हेतू होता. थोडक्यात , NSS चे स्वयंसेवक नियमित तसेच   विशेष शिबिरांमधील उपक्रमांद्वारे समाजाच्या विविध गरजांनुसार सामाजिक संदर्भातील विषयांवर काम करतात. यात खालील विषयांचा समावेश आहे :

  1. साक्षरता व शिक्षण
  2. आरोग्य, कुटुंबकल्याण व पोषण
  3. पर्यावरण संवर्धन
  4. सामाजिक सेवा कार्यक्रम.
  5. महिला सक्षमीकरण
  6. आर्थिक विकासाशी निगडित कार्यक्रम
  7. आपत्तीदरम्यान मदत व बचावकार्य , इ.

 

 

S.Patil/U.Raikar/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1757379) Visitor Counter : 246