आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड-19 संदर्भात अद्ययावत माहिती

Posted On: 23 SEP 2021 9:15AM by PIB Mumbai

 

राष्ट्रव्यापी लसीकरण अभियानाअंतर्गत कोविड-19 प्रतिबंधक लसीच्या आतापर्यंत एकूण 83.39 कोटी मात्रा देण्यात आल्या.


देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या एकूण रुग्णांच्या 1% पेक्षा कमी, सध्या हा दर 0.90%, मार्च 2020 पासूनचा सर्वात कमी


देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या 3,01,640, असून ही संख्या गेल्या 187 दिवसातली सर्वात कमी संख्या


गेल्या 24 तासात देशात 31,923 नव्या रुग्णांची नोंद


रुग्ण बरे होण्याचा दर 97.77%, मार्च 2020 पासून सर्वात जास्त दर


गेल्या 24 तासात 31,990 रुग्ण कोविडमुक्त झाले. देशात आतापर्यंत एकूण 3,28,15,731 रुग्ण कोरोनामुक्त


साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर (2.11%) गेल्या 90 दिवसांपासून 3% पेक्षा कमी


दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर (2.09%) गेले 24 दिवस 3% पेक्षा कमी


आतापर्यंत 55.83 कोटी चाचण्या करण्यात आल्या.

 

***


S.Tupe/Samoada.P/CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1757178) Visitor Counter : 191