PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र

Posted On: 22 SEP 2021 5:45PM by PIB Mumbai

  

  • 82.65 Cr. vaccine doses have been administered so far under Nationwide Vaccination Drive
  • Active cases account for less than 1% of total cases, currently at 0.90%; lowest since March 2020
  • India's Active caseload stands at 3,01,989; lowest in 186 days
  • 26,964 new cases in the last 24 hours
  • Recovery Rate currently at 97.77%; Highest since March 2020
  • 34,167 recoveries in the last 24 hours increases Total Recoveries to 3,27,83,741
  • Weekly Positivity Rate (2.08%) less than 3% for last 89 days
  • Daily positivity rate (1.69%) less than 3% for last 23 days
  • 55.67 crore Total Tests conducted so far

#Unite2FightCorona

#IndiaFightsCorona

Image

नवी दिल्‍ली/मुंबई, 22 सप्‍टेंबर 2021

 

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती

भारतात गेल्या 24 तासात लसींच्या 75,57,529 मात्रा, देण्यात आल्या असून आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार भारतात कोविड-19 प्रतिबंधक लसींच्या आतापर्यंत एकूण 82.65 कोटींपेक्षा अधिक मात्रा (82,65,15,754 ) देण्यात आल्या आहेत. एकूण 81,05,030 सत्रांद्वारे या मात्रा देण्यात आल्या आहेत. गेल्या 24 तासात 34,167 रुग्ण कोविडमुक्त झाले असून (महामारीच्या सुरवातीपासून) यामुळे कोरोनाची लागण झालेल्यांपैकी एकूण 3,27,83,741 रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत. त्यामुळे बरे होण्याचा दर आता 97.77%.झाला आहे.रूग्ण कोविडमुक्त होण्याचा सध्याचा दर मार्च 2020 पासूनच्या ‌सर्वाधिक उच्च स्तरावर आहे.

केंद्र आणि राज्य सरकार/ केंद्रशासित प्रदेश यांच्या समन्वित प्रयत्नांचा परिणाम म्हणून सलग 86 दिवसांपासून 50,000 पेक्षा कमी नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद होत आहे. गेल्या 24 तासात 26,964 नव्या रुग्णांची नोंद झाली. देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या 3,01,989 आहे. उपचाराधीन रुग्ण, आतापर्यंतच्या एकूण पॉझिटीव्ह रुग्णांच्या 0.90% आहेत.

देशभरात चाचण्या करण्याच्या क्षमतेत वाढ सुरुच आहे. देशात गेल्या 24 तासात एकूण 15,92,395 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत 55.67 कोटींहून अधिक (55,67,54,282) चाचण्या केल्या आहेत. देशभरात चाचण्यांच्या क्षमतेत वाढ होत असताना साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर सध्या 2.08% असून गेले 89 दिवस 3% पेक्षा कमी आहे. दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर 1.69% इतका आहे.दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर गेले 23 दिवस 3% पेक्षा कमी आणि 106 दिवस 5% पेक्षा कमी आहे.

 

इतर अपडेट्स :

 

महत्त्‍वाचे ट्विट्स

 

 

 

 

 

 

 

 

 

* * *

M.Chopade/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1757010) Visitor Counter : 191