संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

संरक्षण मंत्री आणि अमेरिकेचे संरक्षणमंत्री यांच्यात दूरध्वनी संभाषण

Posted On: 20 SEP 2021 8:45PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 20 सप्‍टेंबर 2021 

 

अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉईड ऑस्टिन यांनी आज संध्याकाळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना दूरध्वनी केला. दोन्ही नेत्यांनी अफगाणिस्तानमधील घडामोडींसह द्विपक्षीय आणि प्रादेशिक मुद्द्यांवर  चर्चा केली. त्यांनी संरक्षण सहकार्याबाबत  चर्चा केली आणि एकत्रितपणे  काम करण्याची इच्छा व्यक्त केली.  

संरक्षण मंत्री आणि ऑस्टिन यांनी  प्रदेशातील दहशतवादाचा सामना करण्याबाबत एकमेकांचे मत जाणून घेतले. उभय नेत्यांनी अफगाणिस्तानमध्ये अलिकडेच  नागरिकांना मायदेशी परत आणण्याच्या कार्यात परस्पर सहकार्याची प्रशंसा केली आणि बदलत्या परिस्थितीमुळे नियमित संपर्कात राहण्याबाबत सहमती दर्शवली . 

 

* * *

M.Chopade/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1756551) Visitor Counter : 219