रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
दिल्ली, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश आणि गुजरात या राज्यांमधून जाणाऱ्या दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गाच्या प्रगतीचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी 16 - 17 सप्टेंबर रोजी आढावा घेणार
Posted On:
15 SEP 2021 4:37PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 सप्टेंबर 2021
दिल्ली-हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश आणि गुजरात या राज्यांमधून जाणाऱ्या दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गाच्या (डीएमई) प्रगतीचा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी 16 - 17 सप्टेंबर रोजी आढावा घेणार आहेत. 98,000 कोटी रुपये खर्चाने विकसित करण्यात येत असलेला 1380 किमी लांबीचा दिल्ली - मुंबई द्रुतगती मार्ग भारतातील सर्वाधिक लांबीचा द्रुतगती मार्ग ठरेल. हा मार्ग राष्ट्रीय राजधानी दिल्ली आणि आर्थिक राजधानी, मुंबई यांच्यातील संपर्क सुविधा वाढवेल. हा द्रुतगती मार्ग दिल्लीच्या शहरी केंद्रांना दिल्ली-फरीदाबाद-सोहना विभागासह जेवर विमानतळाशी आणि मुंबईत जवाहरलाल नेहरू बंदरातून मुंबईला जाण्यासाठी मार्गिकेच्या माध्यमातून जोडेल.
2018 मध्ये पंतप्रधानांच्या ‘न्यू इंडिया’च्या दृष्टिकोनानुसार संकल्पित दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गाच्या कामाची सुरुवात 9 मार्च 2019 रोजी पायाभरणीसह झाली. द्रुतगती मार्गाच्या 1,380 किलोमीटर लांबीपैकी 1,200 किलोमीटरपेक्षा जास्त कामाची कंत्राटे आधीच दिली गेली आहेत आणि आणि ही कामे प्रगतीपथावर आहेत.
द्रुतगती मार्गाची वैशिष्ट्ये:
- या नवीन द्रुतगती मार्गामुळे दिल्ली आणि मुंबई दरम्यानचा प्रवास सुमारे 24 तासांपासून 12 तासांपर्यंत म्हणजेच निम्म्याने कमी होईल आणि 130 किमी अंतर कमी होईल.
- पर्यावरण आणि वन्यजीवांवर पडणारा प्रभाव कमी करणे ही दिल्ली मुंबई द्रुतगती मार्गाची महत्वाची गोष्ट आहे.
- वन्यजीवांची अनिर्बंध ये-जा सुलभ करण्यासाठी प्राण्यांसाठी विशेष पूल असलेला आशियातील पहिला आणि जगातील दुसरा द्रुतगती मार्ग
- बांधकामपूर्व टप्प्यातील प्रमुख आव्हाने म्हणजे व्यापक भूसंपादन आणि पर्यावरण, वन आणि वन्यजीव यांसारख्या संबंधित बाबींसंदर्भात वेळेवर मंजुरी.
दिल्ली - मुंबई द्रुतगती मार्गाचा नकाशा
![https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image001FT55.jpg](https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image001FT55.jpg)
* * *
S.Tupe/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1755100)
Visitor Counter : 303