संरक्षण मंत्रालय

प्रवासी डॉर्नियर विमान (PVD)भाडेतत्वावर हस्तांतरण समारंभ

Posted On: 14 SEP 2021 2:24PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 14 सप्टेंबर 2021

मॉरिशसच्या राष्ट्रीय तटरक्षक दलाच्या मेरीटाईम एअर स्क्वाड्रन येथे 13 सप्टेंबर 2021 रोजी, प्रवासी डॉर्नियर विमान (PVD) भाडेतत्वावर हस्तांतरित करण्याचा औपचारिक समारंभ पार पडला. भारतीय नौदलाने मॉरिशस पोलीस दलाला, भाडेतत्वावर हे विमान दिले आहे. मॉरिशसचे रस्ते वाहतूक आणि परराष्ट्र मंत्री ॲल गानू, भारताच्या उच्चायुक्त नंदिनी के सिंगला, पोलीस उच्चायुक्त आणि इतर मान्यवर या समारंभाला उपस्थित होते.

मॉरिशसमधील भारतच्या उच्चायुक्त नंदिनी के. सिंगला यांनी या वेळी बोलताना दोन्ही देशांमधील मैत्रीसंबंध आणि नौदलाच्या सहकार्यावर भर दिला. काळानुरूप हे बंध अधिकाधिक दृढ झाल्याचे त्या म्हणाल्या. भारतीय नौदलाने मॉरिशसच्या हवाई कार्यान्वयानात मदत व्हावी या हेतूने पोलीस दलाला MSN 4059 अलीकडेच भाडेतत्वावर दिले आहे, असे ही त्यांनी यावेळी सांगितले. पुढच्या वर्षी हिंदुस्तान एरोनॉटक लिमिटेड (HAL)मॉरिशसला एक अत्याधुनिक प्रवासी डॉर्नीयर देणार असून यासाठीची कर्ज सुविधा मॉरिशस सरकार उपलब्ध करून देणार आहे. मॉरिशसचे रस्ते वाहतूक मंत्री ॲलगानू यांनीही यावेळी आपले विचार मांडले. भारतीय नौदलाने केलेल्या या मदतीबद्दल तसेच भारताकडून सातत्याने मिळत असलेल्या पाठींब्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले.

 त्यानंतर भारताच्या उच्चायुक्त नंदिनी सिंगला यांनी गानू यांच्याकडे औपचारिकदृष्ट्या या कराराची कागदपत्रे सुपूर्द केली.

M.Iyengar/R.Aghor/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1754747) Visitor Counter : 280