संरक्षण मंत्रालय

भारत-आफ्रिका संरक्षण संवाद प्रत्येक DefExpo मधे साधला जाईल

Posted On: 13 SEP 2021 5:51PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 13 सप्‍टेंबर 2021

 

मुख्य ठळक वैशिष्टये:

  • आफ्रिकेतील देश आणि भारता दरम्यान विद्यमान भागीदारीला मदत करण्यासाठी संवाद
  • परस्पर सहकार्यासाठी नव्या क्षेत्रांचा शोध घेण्याकरता संवाद
  • मनोहर पर्रीकर इन्स्टिट्यूट फॉर डिफेन्स स्टडीज अँड अॅनालिसिस ही संस्था ज्ञान भागीदार 
  • आगामी DefExpo 2022च्या पार्श्वभूमीवर पुढल्या भारत आफ्रिका संरक्षण संवादात सहभागी होणाऱ्या आफ्रिकी संरक्षण मंत्र्यांच्या संवादाचे यजमानपद भारताचे संरक्षणमंत्री भूषवतील 

भारत आणि आफ्रिका यांचे जवळचे आणि ऐतिहासिक संबंध आहेत. भारत -आफ्रिका संरक्षण संबंधांचा पाया प्रामुख्याने दोन मार्गदर्शक तत्त्वांवर आधारित आहे एक म्हणजे, प्रदेशातील सर्वांची सुरक्षा  आणि प्रगती (सागर) तसेच वसुधैव कुटुम्बकम, अर्थात जग एक कुटुंब आहे. 

पहिली भारत-आफ्रिका संरक्षण मंत्री परिषद (IADMC) 6 फेब्रुवारी 2020 रोजी उत्तर प्रदेशच्या लखनौ येथे झाली. संरक्षण मंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालयाने  संयुक्तरीत्या याचे आयोजन केले होते. पॅन आफ्रिका कार्यक्रम मालिकेतील मंत्री स्तरावरील ही पहिलीच  परिषद (आयव्ही) होती. आयएडिएमसीच्या समारोपानंतर एक संयुक्त घोषणापत्र, 'लखनऊ घोषणापत्र' म्हणून जारी करण्यात आले.  

घोषणापत्रानंर आणि भागधारकांशी सल्लामसलत करून, भारताने दर दोन वर्षांनी एकदा होणाऱ्या DefExpos दरम्यान भारत आफ्रिका संरक्षण संवाद संस्थात्मक करण्याचा प्रस्ताव दिला.

भारत आफ्रिका संरक्षण संवादाच्या संस्थात्मकीकरणामुळे आफ्रिकन देश आणि भारत यांच्यातील विद्यमान भागीदारी वाढण्यास आणि क्षमता निर्माण, प्रशिक्षण, सायबर सुरक्षा, सागरी सुरक्षा आणि दहशतवादाचा सामना करणे यासारख्या क्षेत्रासह परस्पर गुंतवणूकीच्या नवीन क्षेत्रांचा शोध घेण्यास मदत होईल. 

मनोहर पर्रीकर इन्स्टिट्यूट फॉर डिफेन्स स्टडीज अँड अॅनालिसिस हे भारत-आफ्रिका  संरक्षण संवादाचे  ज्ञान भागीदार असतील तसेच भारत आणि आफ्रिका यांच्यात वाढीव संरक्षण सहकार्यासाठी आवश्यक सहाय्य प्रदान करण्यात मदत करतील असा निर्णय यावेळी घेण्यात आला.

संरक्षण मंत्री श्री राजनाथ सिंह 2022 मध्ये आफ्रिकन राष्ट्रांच्या संरक्षण मंत्र्यांचे यजमानपद भूषवतील - मार्च 2022 मध्ये गांधीनगर, गुजरात इथे  DefExpo चे आयोजन होणार आहे.  'भारत - आफ्रिका: संरक्षण आणि सुरक्षा सहकार्याला एकत्रित करण्यासाठी आणि बळकट करण्याकरता धोरण ठरविणे'  ही या संरक्षण संवादाची व्यापक संकल्पना असेल.

 

* * *

M.Iyengar/V.Ghode/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1754571) Visitor Counter : 242