खाण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

जिल्हा खनिज फाऊंडेशनला प्राप्तीकरातून सूट,  165 डीएमएफला सूट दिल्याबद्दल श्री प्रल्हाद जोशी यांनी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मानले आभार, अर्थमंत्रालयाने जारी केली अधिसूचना

प्रविष्टि तिथि: 11 SEP 2021 7:37PM by PIB Mumbai

 

प्राप्तीकरातून 165 जिल्हा खनिज फाऊंडेशन ट्रस्टना सूट दिल्याबद्दल केन्द्रीय खाण, कोळसा आणि संसदीय कामकाज मंत्री श्री प्रल्हाद जोशी यांनी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.

खाण आणि खनिज (विकास आणि नियमन) (एमएमडीआर) कायदा 2015 मधे सुधारणा करुन भारत सरकारने खाणकामामुळे परिणाम झालेल्या सर्व जिल्ह्यात, जिल्हा खनिज फाऊंडेशन स्थापन करायची तरतूद केली आहे. खाणकामामुळे परिणाम झालेल्या क्षेत्राच्या तसेच व्यक्तींच्या हित आणि लाभासाठी राज्य सरकारने आखून दिलेल्या पद्धतीने काम करणे हे जिल्हा खनिज फाऊंडेशनचे उद्दीष्ट आहे.

आतापर्यंत देशात 22 राज्यातील 600 जिल्ह्यांमधे डीएमएफ स्थापन झाले असून तिथे डीएमएफचे नियम बनवण्यात आले आहेत.

श्री प्रल्हाद जोशी यांनी केन्द्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारमण यांचेही आभार मानले आहेत.

अर्थमंत्रालय (महसूल विभाग) (केन्द्रीय प्रत्यक्ष कर मंडळ) यांनी काल या आशयाची  अधिसूचना जारी केली.

खाण मंत्रालयाने, जिल्हा खनिज फाऊंडेशन  संबंधित प्राप्तीकर अधिनियम, 1961 च्या कलम 10(46) अंतर्गत  प्राप्तीकरातून सूट देण्याकरता अधिसूचना जारी करण्या संदर्भात अर्थ मंत्रालयाला कळवलं होतं.

***

S.Patil/V.Ghode/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1754175) आगंतुक पटल : 192
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Punjabi , Tamil , Kannada