सांस्कृतिक मंत्रालय
विजय गोयल यांनी स्वीकारला गांधी स्मृती आणि दर्शन समितीच्या उपाध्यक्षपदाचा कार्यभार
प्रविष्टि तिथि:
11 SEP 2021 4:52PM by PIB Mumbai
माजी केंद्रीय मंत्री विजय गोयल यांनी काल गांधी स्मृती आणि दर्शन समितीचे उपाध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना जिथे हौतात्म्य प्राप्त झाले त्या गांधी स्मृती, नवी दिल्ली येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात बोलताना विजय गोयल म्हणाले, ``जीएसडीएसच्या (गांधी स्मृती दर्शन समिती) उपाध्यक्षपदाची पदाची धुरा माझ्या खांद्यावर देऊन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझ्यावर खूप मोठी जबाबदारी दिली आहे आणि माझ्याप्रति विश्वास दाखविला आहे” ते पुढे म्हणाले, ``आम्ही महात्मा गांधीचे जीवन, शिकवण आणि तत्वज्ञानाच्या प्रसारात कोणतीही कसर ठेवणार नाही.``
महात्मा गांधींच्या जीवनाचा संदेश देशभर आणि घरोघरी पोहोचवण्याच्या गरजेवर त्यांनी पुढे भर दिला.
गोयल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या `स्वच्छता`, `डिजीटल इंडिया`, `शौचालयांचे बांधकाम` या प्रकल्पांचा पुनरुच्चार केला आणि म्हणाले, या प्रकल्पांमधून पुरोगामी भारतासाठी विधायक कार्याची गांधीवादी दृष्टी प्रतिबिंबित होते.
त्यापूर्वी जीएसडीएसचे संचालक दिपांकर श्री ग्यान यांनी आपल्या स्वागतपर भाषणात समितीची आणि समितीकडून विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांच्या माध्यमातून गांधीजींच्या जीवनकार्याचा संदेश प्रसारित करण्यासाठी होत असलेल्या कामकाजाची माहिती दिली.
***
S.Patil/S.Shaikh/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1754119)
आगंतुक पटल : 212