उपराष्ट्रपती कार्यालय

उपराष्ट्रपतींनी 2024 मध्ये होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताच्या पदकांची संख्या दुप्पट करण्यासाठी प्रयत्न करण्याचे केले आव्हान

भारतीय पॅरा- क्रीडापटूंच्या कामगिरीने दिव्यांगाप्रति लोकांचा दृष्टीकोन बदलला- उपराष्ट्रपती

एसआरएम इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या तिरुचिरापल्ली कॅम्पसचे उद्‌घाटन

Posted On: 09 SEP 2021 4:49PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 9 सप्टेंबर 2021

उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू यांनी आज टोक्यो ऑलिम्पिकमध्ये उत्तम कामगिरी बजावलेल्या आपल्या खेळाडूंचे कौतुक केले आणि 2024 मध्ये पॅरिस येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये दुप्पट पदके कमावण्याचे आवाहन खेळाडूंना केले. खासगी क्षेत्रासह भागधारकांनी आपल्या तरूण आणि इच्छुक खेळाडूंसाठी सर्वसमावेशक समर्थन प्रणाली तयार करण्याचे आवाहन यावेळी केली.

एसआरएम इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या तिरुचिरापल्ली कॅम्पसचे उद्‌घाटन करताना उपराष्ट्रपती म्हणाले की, टोक्यो ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिकमध्ये भारताच्या खेळाडूंनी दाखविलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे आपल्या देशवासियांचे ऊर अभिमानाने भरून आले आहे.

नवीन पुनरुत्थानशील आणि महत्त्वाकांक्षी भारत निर्माण करण्यासाठी दर्जेदार शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करीत, उपराष्ट्रपतींनी आपल्या विद्यापीठ आणि महाविद्यालयांमधून उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचे आवाहन केले.

पर्यावरण आणि हवामान बदलामुळे होणारे प्रतिकूल परिणाम कमी करण्यासाठी तांत्रिक प्रगती निर्देशित करण्याच्या गरजेवर जोर देत , उपराष्ट्रपतींनी मत व्यक्त केले की, विज्ञान आणि तंत्रज्ञानाने माणसाच्या दैनंदिन समस्यांचे निराकरण केले पाहिजे आणि एकूण जीवनमान सुधारले पाहिजे.

शिक्षण क्षेत्रात शहरी आणि ग्रामीण यातील दरी कमी करण्याचे आवाहन करीत, त्यांनी विद्यार्थी केंद्रित शिक्षण आणि शिकण्याची पद्धतीमध्ये सामाजिक सहाय्याची गरज यानिमित्ताने अधोरेखित केली.

तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, एसआरएम इन्स्टिट्यूटचे संस्थापक कुलगुरु  खासदार टी. आर. परिवेधर, अध्यक्ष आणि अन्य या आभासी पद्धतीने झालेल्या कार्यक्रमाला उपस्थित होते.

भाषणाचा संपूर्ण मजकूर पुढे दिला आहे :

 

Jaydevi PS/S.Shaikh/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1753527) Visitor Counter : 46