सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

क्षमता निर्मिती प्रशिक्षण, सर्वोत्तम पद्धती आणि तंत्रज्ञानाची देवाणघेवाण याद्वारे एमएसएमईना मार्गदर्शन सहाय्य करण्याची गरज एमएसएमई सचिवांकडून अधोरेखित


इब्सा (आयबीएसए) परिषदेने तीन देशांमध्ये उत्तम सहकार्यासाठी सामूहिक प्रयत्नांचे केले आवाहन

Posted On: 08 SEP 2021 11:21AM by PIB Mumbai

एमएसएमईची ताकद, संधी आणि आव्हानांविषयी जागरूकता निर्माण करण्यात आणि तयार उत्पादनांसाठी बाजारपेठ निर्माण करण्यात तसेच  क्षमता निर्मिती  प्रशिक्षण, सर्वोत्तम पद्धती आणि तंत्रज्ञानाची देवाणघेवाण याद्वारे एमएसएमईना मार्गदर्शन सहाय्य करण्यात इब्सा (आयएसबीए) मंच महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो असे सचिव (एमएसएमई)  बी बी स्वैन म्हणाले. लघु आणि मध्यम उद्योग संबंधी  (एसएमई) तीन देशांच्या आयबीएसए सहाव्या आभासी परिषदेचे उद्घाटन करताना स्वैन म्हणाले की,व्यापाराला प्रोत्साहन देणे, व्यापारातील अडथळे समजून घेणे,तिन्ही देशांमध्ये उत्तम सहकार्यासाठी सामूहिक प्रयत्नांद्वारे गुंतवणूक सुलभ करणे या उद्देशाने  या बैठका आयोजित केल्या जात आहेत.

आयबीएसए हा एक अनोखा मंच आहे जो भारत, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिका या सामायिक आव्हानांचा सामना करणाऱ्या तीन वेगवेगळ्या खंडांतील तीन मोठ्या लोकशाही देशांना आणि  प्रमुख अर्थव्यवस्थांना एकत्र आणतो.

एमएसएमई मंत्रालयाने गेल्या आठवड्यात राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळ  (NSIC), ब्राझीलची सूक्ष्म आणि लघु उद्योग सहाय्य सेवा  (SEBRAE), दक्षिण आफ्रिकेचा  लघु उद्योग विकास विभाग  (DSBD) आणि लघु उद्योग विकास संस्था (SEDA) यांच्या सहकार्याने या  परिषदेचे आयोजन केले होते. 

 

एनएसआयसीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक  विजयेंद्र यांनी आपल्या भाषणादरम्यान सांगितले की 6 व्या आयबीएसए परिषदेची मुख्य संकल्पना  "लोकसंख्या  आणि विकासासाठी लोकशाही" अशी आहे.  नियामक वातावरण, तंत्रज्ञान सहाय्य, वित्तपुरवठा आणि आयबीएसए सदस्यांनी कोविड -19 महामारी दरम्यान हाती घेतलेल्या पुढाकारांच्या बाबतीत एकमेकांच्या अनुभवांमधून आणि सर्वोत्तम पद्धतींमधून बरेच काही  शिकण्यासारखे आणि सामायिक करण्यासारखे आहे यावर त्यांनी भर दिला.

ब्राझीलची सूक्ष्म आणि लघु उद्योग सहाय्य सेवा  (SEBRAE) चे  प्रशासन आणि वित्त संचालक एडुआर्डो डिओगो म्हणाले की, कोविड 19 महामारीमुळे उद्भवलेली आव्हाने असूनही, एसएमई अजूनही नवसंशोधन करत आहेत आणि रोजगार निर्माण करत आहेत आणि आयबीएसएने  त्यांच्या शाश्वत विकासाच्या दिशेने काम करण्याची गरज आहे .

 

दक्षिण आफ्रिकेचा  लघु उद्योग विकास विभाग  (DSBD) चे महासंचालक लिंडोकुहले मखुमणे यांनी एमएसएमईला प्रोत्साहन देऊन गरीबी , असमानता आणि बेरोजगारी यासारख्या समस्या सोडवता येऊ शकतात यावर भर  दिला.

एमएसएमई क्षेत्रातील आयबीएसए सदस्यांमधील सहकार्य वाढवण्यासाठी ही परिषद एक महत्त्वाचा उपक्रम असून  प्रत्येक देशाची क्षमता आणि अंगभूत ताकद एकत्र आणते.

***

Jaydevi PS/SK/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1753091) Visitor Counter : 274