दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक, एलआयसी हाऊसिंग फायनान्सने गृहकर्ज पुरवण्यासाठी धोरणात्मक भागीदारीची घोषणा केली

Posted On: 07 SEP 2021 5:44PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 7 सप्टेंबर 2021

संचार मंत्रालय, टपाल खात्याच्या अंतर्गत इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB), आणि देशाची प्रमुख गृहनिर्माण वित्त कंपनी एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (LICHFL) ने आज इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या  4.5 कोटी ग्राहकांना गृह कर्ज उत्पादने पुरवण्यासाठी धोरणात्मक भागीदारीची घोषणा केली. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक 650  शाखांचे  मजबूत आणि व्यापक जाळे  आणि 136,000 पेक्षा जास्त बँकिंग ऍक्सेस  पॉइंट्सद्वारे, एलआयसी हाऊसिंग फायनान्सची गृह कर्ज उत्पादने संपूर्ण भारतातील ग्राहकांना उपलब्ध करून देईल.

सामंजस्य कराराचा भाग म्हणून, सर्व गृह कर्जासाठी क्रेडिट अंडरराइटिंग, प्रोसेसिंग आणि वितरण हे एलआयसीएचएफएल करेल आणि  सोर्सिंगसाठी आयपीपीबी जबाबदार असेल.  एलआयसीएचएफएलसोबतची भागीदारी ही आयपीपीबीची उत्पादने  आणि सेवांची श्रेणी वाढवण्याच्या आणि देशभरातील वैविध्यपूर्ण ग्राहकांच्या बँकिंग आणि आर्थिक गरजा पूर्ण करण्याच्या धोरणाचा एक भाग आहे. सध्या, आयपीपीबी अग्रगण्य विमा कंपन्यांसह भागीदारीद्वारे विविध सामान्य आणि जीवन विमा उत्पादने वितरीत करत आहे आणि शेवटच्या मैलावरील  ग्राहकांसाठी कर्ज उत्पादने हा नैसर्गिक विस्तार आहेत. आयपीपीबीचे  सुमारे 200,000 टपाल कर्मचारी (पोस्टमन आणि ग्रामीण डाक सेवक) मायक्रो-एटीएम आणि बायोमेट्रिक उपकरणांसह सुसज्ज असून नावीन्यपूर्ण डोअरस्टेप बँकिंग सेवेद्वारे एलआयसीएचएफएलचे गृहकर्ज देण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील

एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड, पगारदार व्यक्तींसाठी 50 लाख रुपयांपर्यंत कर्जासाठी 6.66% दराने गृह कर्ज देते. देण्यात आलेला व्याजाचा दर कर्जदाराच्या पत संबंधी पात्रतेशी जोडलेला आहे, जो त्यांच्या सिबिल  स्कोअरमध्ये दिसून येतो.

एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचे विशिष्ट  गृहकर्ज उत्पादन - गृहवरिष्ठ - हे पीएसयू विमाधारक, केंद्र/राज्य सरकार, रेल्वे, संरक्षण, बँकांचे सेवानिवृत्त किंवा कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी आहे , ज्यात परिभाषित लाभ पेन्शन योजनेअंतर्गत ते निवृत्तिवेतनासाठी पात्र आहेत. कर्ज घेण्याच्या वेळी कर्जदाराचे वय 65 वर्षांपर्यंत असू शकते आणि कर्जाची मुदत 80 वर्षे पूर्ण होईपर्यंत किंवा जास्तीत जास्त 30 वर्षांपर्यंत,यापैकी  जे आधी असेल. या उत्पादनाअंतर्गत एलआयसी एचएफएल कर्जदाराला कर्जाच्या कार्यकाळात 6  हप्ते माफ करते.

 

 

M.Chopade/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1752888) Visitor Counter : 283