उपराष्ट्रपती कार्यालय

टाळता येणाऱ्या अंधत्वाला प्रतिबंध करण्याचे उपराष्ट्रपतींचे आवाहन


सार्वजनिक इमारती व  वापराच्या जागा द्विव्यांगांसाठीच्या सुविधांनी सुसज्ज असायला हव्यात :  उपराष्ट्रपती

श्री रामकृष्ण सेवाश्रमाच्या रौप्यमहोत्सवी सोहळ्याला उपराष्ट्रपतींची दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थिती. उपराष्ट्रपतींच्या हस्ते पावगदा येथील शारदादेवी नेत्र रुग्णालय आणि संशोधन केंद्राच्या नव्या जागेचे उद्घाटन

Posted On: 04 SEP 2021 7:37PM by PIB Mumbai

 

नेत्रसंबधित आरोग्याबद्दल जनजागृती आणि ग्रामीण भागात उपलब्ध असेल अशा किफायतशीर नेत्र आरोग्य उपाययोजना यामुळे टाळता येण्याजोग्या अंधत्वाला प्रतिबंध करता येईल असे आग्रही प्रतिपादन उपराष्ट्रपती एम् व्यंकय्या नायडू यांनी आज केले.

पावगदा येथील श्री रामकृष्ण सेवाश्रम आणि श्री शारदादेवी नेत्र रुग्णालय व संशोधन केंद्राच्या नवीन जागेचे उद्घाटन उपराष्ट्रपतींनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून केले तेव्हा ते बोलत होते.

सरकारी व खाजगी क्षेत्राने दिव्यांगव्यक्तींना पूरक अशी बांधकामे उभारावी असे आवाहन नायडू यांनी केले. प्रत्येक सार्वजनिक इमारती व सुविधा या दिव्यांगव्यक्तींना सुविधाजनक असल्या पाहिजेत असे ते म्हणाले.

गरीबातील गरीबापर्यंत दर्जेदार आरोग्यसेवा पोचवल्याबद्दल श्री रामकृष्ण सेवाश्रमाचे संस्थापक आणि अध्यक्ष स्वामी जपानंदजी यांची प्रशंसा करत, समाजातील क्षय व कुष्ठरोगनिर्मूलनासाठी त्यांनी तसेच  त्यांनी व त्यांच्या सहकारीवर्गाने केलेल्या निस्वार्थ सेवेबद्दल नायडूंनी कौतुगोद्गार काढले.

स्वतःत सेवाभाव रुजवण्याचे तसेच गरीब व गरजूंच्या कल्याणासाठी जमेल तेवढा सहभाग देण्याचे आवाहन आवाहन नायडू यांनी यावेळी केले.

नव्याने तयार झालेल्या जागेला आर्थिक मदत केल्याबद्दल इन्फोसिस फाउंडेशनच्या अध्यक्ष सुधा मुर्ती यांचीही उपराष्ट्रपतींनी प्रशंसा केली.

 

संपूर्ण भाषण येथे वाचता येईल

***

Jaydevi PS/V.SahajraoP.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1752094) Visitor Counter : 141