आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

देशातील एकूण कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाने पार केला 67 कोटी मात्रांचा महत्वपूर्ण टप्पा


गेल्या 24 तासांत 74 लाखांहून अधिक लसींच्या मात्रा देण्यात आल्या.

देशात रुग्ण बरे होण्याचा सध्याचा दर 97.45%

देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे 45,352 नवे दैनंदिन रुग्ण

देशातील सध्या उपचाराधीन रुग्णसंख्या(3,99,778) ही एकूण रुग्णांच्या 1.22 %

साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर (2.66%) गेले 70 दिवस हा दर 3% पेक्षा कमी

Posted On: 03 SEP 2021 9:55AM by PIB Mumbai

लसीकरणातील महत्वपूर्ण टप्पा पार करत देशातील  एकूण कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाने आज  67 कोटी मात्रांचा टप्पा पार केला. देशव्यापी लसीकरण अभियाना अंतर्गत देशात  गेल्या 24 तासात 74,84,333  मात्रा  देण्यात आल्या असून, आज सकाळी 7  वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार आतापर्यंत 67.09  कोटीपेक्षा जास्त मात्रा (67,09,59,968) दिल्या आहेत. एकूण 70,34,846 सत्रांद्वारे  या मात्रा देण्यात आल्या  आहेत.

आज सकाळी 7 वाजेपर्यंत उपलब्ध झालेल्या एकूण आकडेवारीनुसार या मात्रांचे वर्गीकरण पुढील प्रमाणे आहे-

 

HCWs

1st Dose

1,03,59,980

2nd Dose

84,31,889

 

FLWs

1st Dose

1,83,27,552

2nd Dose

1,33,92,967

 

Age Group 18-44 years

1st Dose

26,38,65,685

2nd Dose

3,10,32,810

 

Age Group 45-59 years

1st Dose

13,43,94,957

2nd Dose

5,65,34,391

 

Over 60 years

1st Dose

8,85,83,164

2nd Dose

4,60,36,573

Total

67,09,59,968



देशभरात कोविड लसीकरणाचा वेग आणि व्याप्ती वाढवण्यासाठी केंद्र सरकार कटीबद्ध आहे.


गेल्या 24 तासात  34,791 रुग्ण कोविडमुक्त झाले असून( महामारीच्या सुरवातीपासून) आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्यांपैकी  एकूण 3,20,63,616 रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत.  


यामुळे कोरोनातून बरे होण्याचा दर 97.45 इतका झाला आहे.



केंद्र आणि राज्य सरकार/ केंद्र शासित प्रदेश यांच्या समन्वयित प्रयत्नांमुळे गेल्या

सलग  68  दिवसांपासून  50,000 पेक्षा कमी नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद होत आहे.


गेल्या 24 तासात  42,352 नव्या रुग्णांची नोंद झाली.



 देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 3,99,778 आहे.उपचाराधीन रुग्णसंख्या ही आतापर्यंतच्या , एकूण रुग्णसंख्येच्या 1.22 %   आहे.



देशात कोविड चाचण्या  करण्याच्या क्षमतेत वाढ सुरु असून, गेल्या 24 तासात 16,66,334  चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण  52.65 कोटीहून अधिक  (52,65,35,068) चाचण्या केल्या आहेत.

 

देशभरात चाचण्यांच्या क्षमतेत वाढ होत असताना साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर सध्या 2.66% असून गेले 70 दिवस हा दर 3% पेक्षा कमी आहे. दैनंदिन पॉझीटीव्हिटी 2.72% असून गेल्या  88  दिवसांपासून हा दर   5% पेक्षा कमी आहे.


***

UU/SP/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1751666) Visitor Counter : 220