पंतप्रधान कार्यालय

जन्माष्टमीनिमित्त दिलेल्या शुभेच्छांबद्दल पंतप्रधानांनी मानले लता मंगेशकर यांचे आभार

Posted On: 30 AUG 2021 10:17PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 30 ऑगस्‍ट 2021

 

लता मंगेशकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या होत्या, या शुभेच्छांबद्दल पंतप्रधानांनी लतादीदींचे आभार मानले आहेत. लतादीदींनी   पंतप्रधानांना शुभेच्छा देणारे ट्विट करत त्यासोबत एक गुजराती भजन जोडले होते.  

"आशीर्वादासाठी आपले खूप खूप आभार लतादीदी! आपल्यालाही जन्माष्टमीच्या अनेक शुभेच्छा! आपल्या सूरांनी सजलेलं हे भजन मंत्रमुग्ध करणारं आहे." असं ट्विट पंतप्रधानांनी उत्तरादाखल केले आहे.  

 

 

* * *

M.Chopade/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1750592) Visitor Counter : 160