ऊर्जा मंत्रालय
देशातली उर्जेची गरज भागवण्यासाठी एनटीपीसीने उचललेली पाऊले
प्रविष्टि तिथि:
30 AUG 2021 3:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 ऑगस्ट 2021
देशात उर्जेच्या मागणीत मोठी वाढ दिसून येत असून ग्रीडच्या आवश्यकतेनुसार मागणीची पूर्तता करण्यासाठी एनटीपीसी म्हणजेच राष्ट्रीय औष्णिक उर्जा महामंडळ सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी एनटीपीसी सज्ज होत असून एनटीपीसी समूहातल्या केंद्रातून, निर्मितीमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत 23% वाढ नोंदवण्यात आली आहे.
वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी खालील पाऊले उचलण्यात आली आहेत :
- कोळसा धोरणाच्या लवचिक वापराअंतर्गत ज्या केंद्रांवर कोळसा साठा परिस्थिती चिंताजनक आहे अशा ठिकाणी एनटीपीसी, कोळश्याची व्यवस्था करत आहे.
- ज्या केंद्रांवर कोळश्याची स्थिती चिंताजनक आहे अशा ठिकाणी कोळसा साठा वाढवण्यासाठी कोल इंडिया आणि रेल्वेशी सातत्याने समन्वय राखला जात असून आवश्यक त्या ठिकाणी रेल्वेच्या वाघिणी वळवल्या जात आहेत.
- याआधी नोंदवण्यात आलेल्या करारातून दारलीपल्ली युनिट #2 (800मेगा वॅट) कार्यान्वित करण्यात आले असून 01-09-2021पासून त्याचे वाणिज्यिक संचालन सुरु करण्यात येणार आहे.
- एनटीपीसीच्या सर्व खाणीतून कोळसा उत्पादन वाढवण्यात येत आहे.
- उर्जा निर्मिती कंपन्यासाठी गॅसची व्यवस्था करण्यासाठी किमान एका आठवड्यासाठी राज्यांनी नियोजन करावे अशी विनंती करण्यात आली आहे.
* * *
Jaydevi PS/N.Chitale/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1750420)
आगंतुक पटल : 242