पंतप्रधान कार्यालय

टोक्यो येथील पॅरालिम्पिक स्पर्धेत भालाफेक या प्रकारात रौप्य पदक जिंकल्याबद्दल देवेंद्र झाझरिया यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

Posted On: 30 AUG 2021 9:47AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टोक्यो येथील पॅरालिम्पिक स्पर्धेत भालाफेक या प्रकारात रौप्य पदक पटकावल्याबद्दल देवेंद्र झाझरिया यांचे अभिनंदन केले आहे.


आपल्या ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;

" @ DevJhajharia देव झाझरिया यांची उत्कृष्ट कामगिरी! आपल्या सर्वात अनुभवी खेळाडूने रौप्य पदक जिंकले. देवेंद्र  भारताच्या गौरवात  सतत भर घालीत आहे. त्याचे हार्दिक अभिनंदन. त्याच्या भावी कामगिरीसाठी त्याला शुभेच्छा. #पॅरालिम्पिक्स"

***

JaideviPS/SampadaP/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1750370) Visitor Counter : 181