PIB Headquarters
पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र
Posted On:
27 AUG 2021 8:26PM by PIB Mumbai

- 61.22 Cr. vaccine doses have been administered so far under Nationwide Vaccination Drive
- 44,658 new cases in the last 24 hours
- Active cases account for 1.06% of total cases
- India's Active caseload stands at 3,44,899
- Recovery Rate currently at 97.60%
- 32,988 recoveries in the last 24 hours increases Total Recoveries to 3,18,21,428
- Weekly Positivity Rate (2.10%) less than 3% for last 63 days
- Daily positivity rate (2.45%) less than 3% for last 32 days
- 51.49 crore Total Tests conducted so far
|
#Unite2FightCorona
#IndiaFightsCorona


नवी दिल्ली/मुंबई, 27 ऑगस्ट 2021
आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती
भारतातील लसीकरण मोहिमेत देण्यात आलेल्या कोविड प्रतिबंधक लसीच्या एकूण मात्रांच्या संख्येने काल 61 कोटींचा महत्त्वपूर्ण टप्पा पार केला. देशात गेल्या 24 तासांत लसीच्या 79,48,439 मात्रा देण्यात आल्या असून आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या माहितीनुसार भारतातील लसीकरण मोहिमेत देण्यात आलेल्या कोविड प्रतिबंधक लसीच्या एकूण मात्रांच्या संख्येने (61,22,08,542) 61 कोटी 22 लाखांचा टप्पा पार केला आहे. 66,60,983 लसीकरण सत्रांच्या आयोजनातून हे साध्य करण्यात आले. देशभरात कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा वेग वाढवणे आणि मोहिमेच्या व्याप्तीचा विस्तार करणे यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे.
गेल्या 24 तासांत 32,988 रुग्ण कोविडमुक्त झाल्यामुळे (महामारीच्या सुरुवातीपासून) कोविडमधून बरे झालेल्यांची संख्या आता 3,18,21,428 झाली आहे. परिणामी, भारताचा रोगमुक्ती दर सध्या 97.60% आहे.
केंद्र सरकार तसेच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश सरकारे यांच्या शाश्वत आणि सहयोगात्मक प्रयत्नांमुळे गेले सलग 61 दिवस, रोज नोंदल्या जाणाऱ्या नव्या कोविड बाधितांची संख्या 50,000 पेक्षा कमी असल्याचे दिसून आले आहे. गेल्या 24 तासांत, भारतात 44,658 नव्या कोविडग्रस्त रुग्णांची नोंद झाली. सध्या कोविड सक्रिय रुग्णांची संख्या 3,44,899 आहे. कोविड सक्रिय रुग्णांची संख्या देशातील एकूण कोविड बाधित रुग्णसंख्येच्या 1.06% आहे.
देशात कोविड संसर्ग तपासणी चाचण्यांच्या क्षमतेचा विस्तार सुरु आहे. गेल्या 24 तासांत एकूण 18,24,931 चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत कोविड संसर्ग तपासणीच्या एकूण 51 कोटी 49 लाख (51,49,54,309) चाचण्या करण्यात आल्या आहेत. देशभरात कोविड चाचण्यांच्या क्षमतेचा विस्तार करत असताना, साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 2.10% आहे, हा दर गेले 63 दिवस 3% हून कमी राहिला आहे. दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर 2.45% इतका आहे. दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर आता गेले 32 दिवस 3% हून कमी आणि सलग 81 दिवस 5% हून कमी राहिला आहे.
इतर अपडेट्स :
Important Tweets
* * *
M.Chopade/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1749679)
अभ्यागत कक्ष : 173