गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय मंत्रिमंडळाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी रास्त आणि किफायतशीर किंमत (एफआरपी) वाढवल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मानले आभार

Posted On: 25 AUG 2021 7:52PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 25 ऑगस्‍ट 2021

 

ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी रास्त आणि किफायतशीर किंमत (एफआरपी) वाढवण्याचा निर्णय केंद्रीय  मंत्रिमंडळाने घेतल्याबद्दल  केंद्रीय  गृहमंत्री अमित शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत., “मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या समृद्धी आणि कल्याणासाठी वेळोवेळी अनेक महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. त्याच निर्धाराचा पुनरुच्चार करत, आज मंत्रिमंडळाने  ऊस उत्पादकांसाठी  एफआरपी किंमत 290 रुपये प्रति क्विंटल पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाबद्दल मी पंतप्रधान  नरेंद्र मोदींचे आभार मानतो. असे अमित शाह यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

 

‘सुलभ  शेती-आत्मनिर्भर शेतकरी’ या दिशेने घेतलेल्या या निर्णयामुळे साखरेची निर्यात आणि इथेनॉलचे उत्पादन वाढेल, परिणामी ऊस उत्पादकांचे उत्पन्न देखील वाढेल. मोदी सरकारच्या या कल्याणकारी निर्णयामुळे देशातील 5 कोटी ऊस उत्पादक  शेतकरी कुटुंबांना आणि त्याच्याशी निगडित त 5 लाख कामगारांना अभूतपूर्व लाभ मिळतील, असंही शाह यांनी म्हटले आहे.

 

 

* * *

R.Aghor/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1749022) Visitor Counter : 265